72 तासानंतरही पिक पाण्यात, कसा करणार नुकसानीचा दावा ? काय आहे पर्याय

| Updated on: Sep 30, 2021 | 12:38 PM

शेतकऱ्यला पदरात पाडून घ्यावयाची असेल तर नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये नुकसानीचा दावा तो ही ऑनलाईन करायचा आहे. मात्र, पाऊस पडून 72 तास उलटले तरी शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे. शिवाय पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक ह्या वेगळ्याच. साचलेल्या पाण्यामुळे शेतामध्येच प्रवेश करता येत नाही त्यामुळे नुकसानीचा दावा करावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

72 तासानंतरही पिक पाण्यात, कसा करणार नुकसानीचा दावा ? काय आहे पर्याय
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

राजेंद्र खराडे : लातूर : दोन दिवसापूर्वी मराठवाड्यात पावसाने थैमान घातले होते. शेत शिवारतच नव्हे तर गाव वस्त्यावरही पाणीच पाणी साचले आहे. या नुकसान झालेला पिकाची विम्याची रक्कम शेतकऱ्यला पदरात पाडून घ्यावयाची असेल तर नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये नुकसानीचा दावा तो ही ऑनलाईन करायचा आहे. मात्र, पाऊस पडून 72 तास उलटले तरी शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे. शिवाय पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक ह्या वेगळ्याच. साचलेल्या पाण्यामुळे शेतामध्येच प्रवेश करता येत नाही त्यामुळे नुकसानीचा दावा करावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

मराठवाड्यात तब्बल 182 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली होती. शिवाय धरणा लगतच्या शेतामध्ये नदीचे पाणी हे घुसलेले आहे. शेतीपिके पाण्यात आहेत तर काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच खरडून गेल्या आहेत. त्यामुळे नुकसानीचा दावा करण्यास शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापुर्वी झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत.

पीक विमा कंपनीने पंचनामे करण्यास सुरवात केली आणि पावसाने थैमान घातले. आता 72 तासांमध्ये नुकसानीचा दावा करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे पण शेतातील आणि शेतकऱ्यांची परस्थिती पाहिली तर वेळेत पंचनामे होणे अवघड आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही विमा कंपनी कितपत मदत करणार की दावा न झाल्यास शेतकऱ्यांना मदतीपासून वंचितच रहावे लागणार असे प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात घोळत आहेत.

नुकसानीचा दावा न केल्यास काय होणार?

सध्या ओढावलेल्या परस्थितीमध्ये शेतकरी हा नुकसानीचा दावा करु शकला नाही तर काय होणार…यावर पिक विमा कंपनाने काय पर्याय काढला आहे का? तर याचे उत्तर आहे असा कोणताही पर्याय शेतकऱ्यांकडे नाही. नुकसानीच्या दाव्याशिवाय शेतकऱ्याला मदत मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्याचे विमा कंपनीला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे कळवावेच लागणार आहे.

काय चित्र आहे गावशिवारात

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अॅपद्वारे तक्रार नोंदिवण्याची तांत्रिक माहिती नाही. त्यामुळे ज्या तरुणाला याचे ज्ञान अवगत आहे त्या तरुणाकडून अॅपद्वारे माहिती भरुण नुकसानभरपाईसाठी पात्र होण्यास शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. याकरिता हातचे काम सोडू या प्रक्रियेतच शेतकऱ्यांना दिवस वाया घालावा लागत आहे.

महसूल- कृषी विभागाची टोलवाटोलवी

शेतकऱ्यांना ऑनलाईद्वारे तक्रार नोदवण्यास आली नाही तर मंडळ अधिकारी किंवा महसूलच्या तलाठी यांच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येणार आहे. मात्र, हे काम कृषी विभागाचेच आहे. त्यामुळे महसूलचे अधिकारी हस्तक्षेप करीत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

या सहा पध्दतीने नोंदवता येणार तक्रार

1) शेतकऱ्यांना ‘क्रॅप इंन्शुरन्स अॅप’ यामाध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्व:ता भरायची आहे. याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.

2) विमा कंपनीने 18004195004 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. याद्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात.

3) तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाईनही तक्रार करु शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॅार्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.

4) शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही तक्रार नोंदिवता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारीचा अर्ज द्दावा लागणार आहे.

5) पिक विमा कंपनीचा ro.mumbai@aiconfindia.com/pikvima@aicofindia.com हे मेल आयडी आहेत. यावरही तक्रार नोंदविता येणार आहे.

6) ज्या बॅंकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बॅंकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे. (Can you claim damages even after the expiry of the term? What’s the realit)

संबंधित बातम्या :

जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकारचे हजारोंचे अनुदान, असा करा अर्ज

दुध डेअरीच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला मिळणार काम अन् दुध उत्पादकांना प्रोहत्साहन

चवीला गोड अन् औषधी गुण असलेल्या ‘पांढऱ्या कांद्याला’ जागतिक बाजारपेठेत महत्व, गुणधर्मासह लागवड पध्दती