नांदेड : पावसाने नुकसान होऊन महिन्याचा कालावधी लोटला आहे. (Nanded) अद्यापही मदतीबाबत प्रक्रीया ही सुरुच आहे. पीक विमा कंपनीच्या सुचना पुन्हा शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना याचा खेळ हा सुरुच आहे. आता (Survey in the final stages) सर्व्हेक्षण हे अंतिम टप्प्यात आल्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात येत आहे तर दोन (central officer) दिवसांपासून केंद्रातील अधिकारी हे नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. जिल्ह्यातून 3 लाख 94 हजार 215 पूर्वसूचना विमा कंपनीला प्राप्त झाल्या आहेत. पैकी 3 लाख 78 हजार 110 पूर्वसूचनांचा सर्व्हे हा पूर्ण झाला आहे. तर काही शेतकऱ्यांचे नुकसान नसल्याने त्यांना यामधून वगळण्यात आले आहे. आता केंद्र सरकारमधील अधिकारीच विमा कंपनीचा आढावा घेण्यासाठी नांदेड येथे तळ ठोकून आहेत.
जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीपातील पिकांसह फळबागाचेही नुकसान झाले होते. त्यानंतर कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करुन 6 लाख हेक्टरावरील नुकसान झाल्याचा अहवाब हा सादर केला होता तर पूर्वतूचनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील 3 लाख 94 हजार शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना ह्या वेगवेगळ्या विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या.
आता या पूर्वसूचनांचा अहवाल करण्याचे काम सुरु आहे. मात्र, अनेक पूर्वसूचनांवरील नुकसान हे झालेच नसल्याचा प्रताप विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केल्याने पाहणीसाठी केंद्रातील अधिकारी हे थेट नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी विपीन इटनकर तसेच महसूलच्या अधिकाऱ्यांकडून ते नुकसानीचा आढावा घेत आहेत.
पीक नुकसानीची पाहणी झाली, लोकप्रतिनिधी बांधावर आले, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे अहवाल पाठवले मात्र, मदतीबाबत अद्याप काहीच प्रक्रीया ही झालेली नाही. पावसाने उघडीप देऊन चार दिवसाचा कालावधी लोटला आहे. शेतकरी आता रब्बीच्या तयारीला लागला आहे. ऐन गरजेच्या प्रसंगी मदत मिळणार नाही तर काय उपयोग असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. तर दुसरीकडे विमा रक्कम देण्याबाबत विमा कंपन्या किती उदासिन आहेत याचा प्रत्यय नांदेडमध्येच आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पीक विमा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी पूर्वसूचना ह्या विमा कंपनीकडे दिल्या होत्या. मात्र, विम्याचे अर्ज हे ऊसाच्या फडात आढळून आले होते. त्यामुळे त्या अर्जाबाबत काय निर्णय घ्यायचा यामुळे केंद्रीय अधिकारी हे नांदेडमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे शेतात आढळून आले त्याबाबत काय निर्णय होणार हे पहावे लागणार आहे. संबंधित विमा प्रतिनीधींची चौकशी करुन निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Central authorities review farmers’ flood notices in Nanded for inquiry)
शेतकऱ्यांनो गारपीट, वादळाचा विमा हप्ता बॅंकेतच जमा करा अन्यथा….
जनावरांची ऑनलाईल खरेदी-विक्री, शेतकऱ्याला लाखोंचा गंडा ; अशी घ्या काळजी
पाऊस गेला गावाला, आता लागा कामाला ; काय आहे शेतकऱ्यांना सल्ला