मुंबई : (Central Government) केंद्र सरकार केवळ शेतकऱ्यांसाठीच नवनवीन योजना राबवत नाही तर त्याच बरोबर असंघटीत कामगारांसाठीही योजना राबवल्या जात आहेत. आता (E-Shram Card) ई-श्रम कार्डच्या माध्यमातून योजनांचा लाभ तर मिळणार आहेच पण सर्व असंघटीत कामगारांचा डाटा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ई-श्रम कार्ड योजना ही संपूर्ण देशभर राबवली जात आहे. देशात स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कामगारांच्या सुविधांसाठी ही योजना राबवली जात आहे. नोंदणीनंतर (Labour) कामगारांना अपघात विम्याची सुविधा प्राप्त होईल. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत तात्पुरता अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये तर कायम स्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचे विमाकवच लाभरणार आहे. त्यातच भविष्यात असंघटित कामगारांना सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा लाभही मिळणार आहेत. 2020 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा झाली होती तर प्रत्यक्ष सुरवात ही 26 ऑगस्ट 2021 पासून करण्यात आली आहे.
ई-श्रम पोर्टलवर शेतकरी नोंदणी करू शकणार की नाही, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. या ठिकाणी केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच नोंदणी करु शकतात. साधन शेतकरी वा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत, त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येत नाही. केवळ कामगारांना याचा लाभ मिळावा हाच उद्देश सरकारचाही आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. 16 ते 59 या वयोगटातील कोणताही असंघटित कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर ज्याच्याकडे आधार कार्डशी जोडलेला नंबर नसेल तर अशांना नजीकच्या सीएससी सेंटर वर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करता येते.
ऑनलाईन नोंदणीसाठी कामगार ई-श्रम मोबाईल ॲप वा संकेत स्थळांचा वापर करू शकतात. तसेच सेतू सुविधा केंद्र, राज्यसेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिसचे डिजिटल सेवा केंद्र इत्यादी ठिकाणी नोंदणी करता करता येणार आहे. नोंदणीनंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना एक युनिर्व्हसल 12 अंकी अकाऊंट नंबर आणि एक ई-श्रम कार्ड दिले जाते. युएएन देशभरात स्विकारार्ह असते. सामाजिक सुरक्षेसाठी कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्याची गरज भासत नाही.
ई-श्रम पोर्टलवर रोज मोठ्या संख्येने कामगार नोंदणी करत आहेत. आतापर्यंत 21 कोटीहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी 26 ऑगस्ट रोजी हे पोर्टल सुरु झाल्यानंतर अल्पावधीच ऐवढ्या मोठ्या संख्येने नोंदणी झाली आहे. (संबंधित माहिती शासकीय योजना पुस्तिका व विविध माध्यमातून एकत्र केलेली आहे.)
Kharif Season: उत्पादनात घट मात्र, वाढत्या दराने खरिपातील तीन पिकांचा मिळतोय शेतकऱ्यांना ‘आधार’
Untimely Rain : नुकसानीचा अहवाल अन् मदतीसाठी ठरावही, वर्धा पाठोपाठ ‘या’ जिल्ह्याची तत्परता
रब्बी हंगामातील पिकांची काळजी अन् कांदा लागवडीबाबत कृषी तज्ञांचा काय आहे सल्ला?