औरंगाबाद : वातावरणातील बदलाचे नवे संकट आता शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे उत्पादनावरील खर्च तर वाढत आहे पण पदरी काय पडणार याबाबतही शेतकरी अनभिज्ञच आहे. गेल्या वर्षभरापासून उत्पादनाबाबत अस्थिरता वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य नियोजन करुनच चालणार नाही तर (Climate) हवामानाचा अचूक अंदाज घेऊन उपाययोजना लागू केल्या तरच उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे आता हवामान अंदाजावरच (Agricultural Crop) शेती पिकाचे भरघोस उत्पन्न घेण्याचा सल्ला (Weather expert) हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे. आता माध्यमांचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे हवामान अंदाजाची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे सोपे झाले आहे. शेती व्यवसयात होत असलेला विकास टिकवून ठेवायचा असेल तर मात्र, वातावरणातील बदलाची समीकरणे आत्मसात करुनच ते शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हवामान विभागाच्यावतीने अंदाज वर्तवले जातात. पण ते प्रत्येक गावासाठी नव्हते. राज्यात हवामानाची काय स्थिती राहणार असेच ते अंदाज होते. त्यामुळे शेतीच्या बांधावर काय स्थिती राहणार याची कल्पना शेतकऱ्यांना येतच नव्हती. पण महाराष्ट्रातील 42 हजार 260 गावांमध्ये कुठे पाऊस पडेल याचा अंदाज केवळ 30 मिनीट अगोदर देऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका कार्यंक्रमात ते बोलत होत. त्याचे वृत्त दै. दिव्य-मराठीने प्रकाशित केले आहे
यंदा शेतकऱ्यांवर सर्वात मोठे संकट हे वातावरणातील बदलाचे राहिलेले आहे. खरीप हंगामापासून सुरु झालेले हे बदल आता रब्बी हंगामातही कायम आहेत. शिवाय अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण याचा परिणाम केवळ हंगामी पिकावरच झाला असे नाही तर फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रतिकूल परस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना हवामान अंदाजावरच शेती करावी लागणार आहे. याकरिता राज्य सरकारनेही महत्वाचे पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायातीच्या ठिकाणी आता हवामान केंद्र उभारली जाणार आहेत. त्यामुळे बदलत्या शेती पध्दतीमध्ये आता हवामानाचा एक मुद्दा अॅड करावा लागणार आहे.
हवामान विभागाकडून तर वातावरणातील बदलाचा अंदाज वर्तवला जातोच पण स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या कार्यक्रमात किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा अधिकचा फायदा गेल्या वर्षभरात झालेला आहे.
अवकाळीची अवकृपा : पीक नुकसानीचा अहवाल शासनाकडे, शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतिक्षा
Cotton Production : शेवटी बाकी शून्यच ? कापसाला विक्रमी दर मात्र, उत्पादनात निम्म्यानेच घट
Sesame Prices : संक्रातीच्या सणातही तीळाच्या दरात तेजीच, काय आहेत कारणे?