लातुर : पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी पिक पध्दतीत बदल करीत आहे. पण कधी निसर्गाची अवकृपा राहत आहे तर कधी बाजारपेठेचा परिणाम होत आहे. आता पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान झाले असताना भाजीपाल्यातून तरी ऊत्पन्न मिळेल असा आशावाद शेतकऱ्याला होता. मात्र, बाजारपेठेत मिरचीला कवडीमोल दर मिळत आहे. शेतकऱ्याला वाहतूक खर्चही परवडत नसल्याने शिरुर अनंतपाळ तालुक्यातील शेतकऱ्याने मिरचीवर थेट नांगर फिरवून इतर पिकासाठी क्षेत्र रिकामे केले आहे.
तीन महिन्यापुर्वी लागवड केलेली मिरची आता बाजारयोग्य झाली आहे. मात्र, मिरचीचेच नव्हे तर सर्वच भाजीपाल्याचे दर हे कोसळलेले आहेत. त्यामुळे काढणीही परवडत नाही. परिणामी मिरच्या परीपक्व झाल्या असल्या त्याची तोडणीच परवडत नसल्याने मिरच्या ह्या झाडालाच लगडल्या आहेत. शिरुर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यातील येरोळ, कबनसांगवी, नागेवाडी, साताळा, डिगोळ, सुमठाणा या गाव शिवारात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीत बदल केला होता.
मिरची मधून उत्पन्न मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता पण जवळच असलेल्या उदगीर बाजारपेठेत 6 रुपये किलोने व्यापारी मागणी करीत आहेत. त्यामुळे काढणी, वादतूक आणि होणारा खर्च याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकरी मिरचीचे क्षेत्र हे नांगरून काढत आहे. भविष्यात इतर पिक घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे.
मिरची लागवडीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्याला एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना आलेला आहे. आता हिरवी मिरची झाडालाच लाल झाली आहे. असे असताना बाजारात केवळ 6 रुपये किलो असा दर मिळत असल्याने त्याची काढणी करण्यापेक्षा त्यावर नांगर फिरवणेच शेतकऱ्यांनी पसंत केले आहे.
शेती पिकांना बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्याने मेटाकुटीस येत येवल्यात रस्त्यावर टोमॅटो फेकून देतात टोमॅटोचा लाल चिखल केला तर सिमला मिरची, साधी मिरची उपटून देत बांधावर फेकून देत आहेत. त्या पाठोपाठ आता पपईला बाजार भाव नसल्याने येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या साह्याने रोटर मारून संपूर्ण पपई भाग उद्ध्वस्त केली.
येवल्याच्या बाजारपेठेत वाढत असलेली भाजीपाल्याची आवक आणि पावसामुळे झालेला परिणाम यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मध्यंतरी टोमॅटोचे दर कमा झाले होते तर आता सिमला मिरचीचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत की नाही हा प्रश्नय (Chilli prices fall, farmer turns plough)