मुंबई : भारत हा जगातील सर्वात मोठा (Chilly production) मिरची उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. शेतकऱ्यांची मेहनत आणि कृषितज्ञांचे संशोधन यामुळे हे शक्य झाले आहे. उत्पादनात सातत्य राहिल्याने (Chilly Exports) निर्यातीचा आलेख कायम वाढताच राहिलेला आहे. ही सकारात्मक एक बाजू असली तरी दुसरी बाजूही लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होत असले तरी याकरिता एक ना अनेक समस्यांमधून त्याला मार्ग काढावा लागत आहे. वातावरणातील बदलामुळे वाढत असलेल्या रोगराईच्या बंदोबस्तासाठी सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे (Farmer Trouble) शेतकऱ्यांचे प्रश्न हे कायम राहत आहेत. तेलंगणामध्येही मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते पण केवळ त्रिप या रोगामुळे तब्बल 9 लाख एकरावरील मिरचीचे नुकसान झाले होते. असे असले तरी यावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने तेलंगणा सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे पीक जोपासण्यात सरकारची किती अनास्था आहे हेच समोर येत आहे. मुख्य लेखा विभागाच्या अहवालानुसार पीक संरक्षणासाठी मंजूर केलेल्या निधीपैकी केवळ 88.09 टक्केच निधी खर्च करण्यात आला होता.
तेलंगणा हे मिरची उत्पादनात आघाडीवर आहे. येथील शेतकरी नेते अजय वाडियार म्हणतात म्हणतात की, कीडीपासून मिरची पिकाचे संरक्षण व्हावे याकरिता सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. एवढेच नाही तर बनावट कीटकनाशकांवरही बंदी घालण्यात आलेली नाही. तर कृषी तज्ज्ञ बिनोद आनंद म्हणतात की, कीडवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या एजन्सी योग्य प्रकारे काम करत नाहीत. त्यामुळे यावर्षी सुमारे 5 हजार कोटी रुपयांच्या मिरची पिकाचे नुकसान होत आहे. हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. कोट्यावधी रुपयांची मिरची निर्यात होऊन देखील ही अवस्था आहे.
मसाला बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, आसाम इत्यादी मिरचीचे प्रमुख उत्पादक राज्य आहेत. 2020 -21 या वर्षात देशभरात 20 लाख 92 हजार टन मिरचीचे उत्पादन झाले. हेक्टरी उत्पादकता 2 हजार 871 किलोपर्यंत पोहोचली आहे जी 2001-02 मध्ये केवळ 1 हजार 215 किलो होती. 2020-21 मध्ये 8429.75 कोटी रुपयांच्या मिरच्यांची निर्यात झाली. भारत प्रामुख्याने चीन, थायलंड, श्रीलंका, अमेरिका, इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती, व्हिएतनाम आणि इंग्लंड ला मिरची निर्यात करतो.
शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमाचा परिणाम असा आहे की आता कमी पेरणीवर आणखी उत्पादन होत आहे. दरवर्षी निर्यातीतही वाढ होत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये मिरचीची उत्पादकता दुपटीने वाढली आहे. शेतीतील आव्हाने हाताळण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारचा पाठिंबा मिळाला, तर शेतीचे चित्र बदलेल.
*रोगविरोधी संकरित जातींची कमी उपलब्धता.
* उत्पादनाच्या वेळी रोग आणि कीटक टाळण्यासाठी बनावट रसायनांचा वापर.
* मिरची उत्पादनाच्या वेळी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी उपक्रमांची माहिती नसते.
* मिरच्या फोडल्यानंतर त्या कोरड्या करण्याचा योग्य आणि सुरक्षित मार्ग नसतो.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या म्हणण्यानुसार, मिरचीचा रंग, आकार, तिखटपणा आणि वापर यावर आधारित जगभरात सुमारे 400 प्रकारच्या मिरच्या आहेत. भारतात रंग, आकार, तिखटपणा आणि वापरावर आधारित 50 हून अधिक जाती देखील आहेत. 2018 दरम्यान, भारताच्या मिरचीचा जागतिक बाजारपेठेत सुमारे 50 टक्के वाटा होता, तर चीनचा 19 टक्के होता.
Guarantee Price Centre: तुरीची नोंदणी हमी भाव केंद्रावर अन् विक्री खुल्या बाजारात
Betel Leaf Farming : सुपारी पान मळ्यांची शेती करायची कशी? जाणून घ्या कृषितज्ञांचे मत
उन्हाळी हंगामातील नव्या प्रयोगातून निघेल का खरिपातील भरपाई? सर्वकाही पोषक असताना भीती कशाची