नवी दिल्ली: भारतात यंदाच्या खरिप हंगामात मिरचीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटकमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरचीचं उत्पादन घेतात. महिको, सिंजेटा आणि सिमेन्स या कंपन्यांच्या सकंरित वाणाच्या मिरचीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांचा बेडगी मिरची लावण्याकडे कल असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षी वाळलेल्या मिरचीच्या विक्रीतून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न मिलवलं आहे. यंदा पाऊस चांगला होणार असल्याचं चित्र असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मिरची लागवड करण्याची उत्सुकता दिसून येत आहे. (Chilly seeds prices increased farmers look to increase chilly farming for this kharif season)
मिरचीची वाढती मागणी लक्षात घेता विक्रेते आणि शेतकऱ्यांना किमान 10 ते 20 टक्के मिरचीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. BigHaatचे सीईओ आणि सहसंस्थापक सतीश नुकला यांनी गेल्या वर्षी देखील मिरची क्षेत्र वाढलं असल्याचं सांगितलं होतं. 2016 मध्येही मिरचीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं. 2016-17 मध्ये 8.59 लाख हेक्टरवर मिरचीची शेती करण्यात आली होती. त्यावेळी वाळवलेल्या मिरचीचं उत्पादन 21.11 लाख टन होते. शेतकऱ्यांमध्ये मिरची शेती करण्यासाठी उत्साह असला तरी त्या प्रमाणात बियाणं उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
Sygenta कंपनीची HPH 5531 आणि Mahyco च्या तेजस्विनी आणि यशस्विनी वाण तर Nunhem’s च्या आर्मर आणि सेमिनिसच्या बियाण्यांना अधिक मागणी आहे. BigHaat कंपनीकडून शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इंडियन इन्स्टिट्यूटऑफ हॉर्टिकल्चर रिसर्चने 5 प्रकारची हाइब्रिड बियाणं तयार केली आहेत. यावर किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
गेल्यावर्षी कमी उत्पादन झाल्यामुळे बेडगी मिरचीच्या तेजा आणि सानव व्हरायटीच्या बियाण्यामध्ये वाढ झाली होती. 2020-21 च्या अंदाजानुसार यंदा मिरचीचं उत्पादन 40.65 लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीची किंमत 20 टक्केंनी वाढलं आहे. गेल्यावर्षी मिरची 25000 रुपये टन होती. यंदा त्याची किंमत 40 हजार रुपये टनापर्यंत पोहोचली आहे.
VIDEO | पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना महिला थोडक्यात बचावली https://t.co/3HcSJVwfSG #Buldana | #Rain | #FloodWater | #Video
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2021
संबंधित बातम्या:
मका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु
(Chilly seeds prices increased farmers look to increase chilly farming for this kharif season)