इंदापूर : बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा शेती पिकावर परिणाम झाला आहे त्याचप्रमाणे शेतीच्या जोडव्यवसायावरही होत आहे. वाढणारी थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे इंदापूर कृषी बाजार समितीमध्ये मासाळी बाजारात आवक घटली आहे. तर दुसरीकडे माश्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. वातावरणामुळे मासेमारीसाठी अडचणी निर्माण होत असल्याने आवक घटत आहे. शिवाय अशीच स्थिती राहिली तर मात्र, माशांच्या दरामध्ये अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हिवाळ्यात पाऊस आणि ऊनाचीही अनुभती नागिकांना येत आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे मासेमारीत अडचणी निर्माण होत असल्याने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माशांची आवक ही 30 टक्क्यांनी घटलेली आहे. तर दरामध्ये 20 ते 60 रुपयांनी वाढ झालेली आहे.
इंदापूर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झालेला आहे. थंडी आणि ढगाळ वातावरण असल्याने मासाळी बाजारात माश्यांची आवक ही 30 टक्क्यांनी घटलेली आहे. मागील दोन आठवड्यापर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मासाळी बाजारात चिपालीची आवक ही 16 ते 20 टन होती. ती आता 12 ते 15 टनावर आली आहे. मरळ मासा हा 300 ते 400 किलो येत होता तो आता 200 ते 300 किलोवर आला आहे. रोहू व कटला यांची आवक 1600 ते 2000 किलो होत होती. ती आत्ता 1000 ते 1200 किलोवर आली आहे.
आवक कमी होत असल्याचा थेट परिणाम आता माशांच्या दरावर होत आहे. दिवसभरात होणाऱ्या आवकनुसार दर हे ठरत आहेत. वांब पूर्वी 250 ते 350 रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत होती. ती आत्ता 300 ते 500 रुपयांवर पोहचली आहे. चिलापी 20 ते 100 रुपयांना मिळत होती. तर आता 30 ते 140 रुपयां दर पोहोचले आहेत.
आवक कमी असल्याने बाजारात मासे दाखल होताच. त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे खवय्ये सकाळपासूनच मासे खऱेदी करण्यासाठी करण्यासाठी गर्दी करीत आहे. मात्र, वातावरण असेच राहिल्यास अजून आवक कमी होऊन त्याचा दरावर परिणाम होणार आहे.
दिवसाकाठी 150 रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ, चार दिवसांपासून सातत्य
निलंग्यात राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा अन् दहाव्या दिवशीही होणार दहाव्याचा विधी