लातूर : अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील (Marathwada) आठही जिल्ह्याला बसलेला होता. त्याअनुशंगाने पाहणी, पंचनामे, लोकप्रतिनिधी थेट बांधावर देखील आले. मात्र, (State Government) राज्य सरकारच्या मदतीनंतर खरचं मराठवाड्यातील पीकाचे नुकसान झाले याचा अंदाज येत आहे. एनडीआरएफ (NDRF Norms) च्या निकषानुसार 33 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले होते तर नुकसानभरपाईसाठी 2585 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारकडून मराठवाड्यासाठी ढळते माप देण्यात आले आहे. 3700 कोटी रुपयांची मदत मराठवाड्याच्या वाटेला येणार आहे.
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीन, उडीद ही पीके तर पाण्यातच होती पण शेत जमिनीही खरडून गेल्या होत्या. त्यामुळे नुकसानीची दाहकता सर्वानाच आली होती पण प्रत्यक्षात किती मदत मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. एनडीआपएफ च्या निकषाप्रमाणे 2585 कोटी रुपयांची गरज असल्याचे जाहीर करण्यात आले असतानाच दुसरीकडे राज्य सरकारने 10 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. यामध्ये मराठवाड्याच्या वाटेला 3700 कोटी म्हणजेच एनडीआरएफ च्या निकषांच्या तुलनेत 975 कोटी हे अधिकचे मिळालेले आहेत. त्यामुळे आता या निधीचे वितरण कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.
जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल
औरंगाबाद विभागासाठी 3700 कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अधिकचे नुकसान हे झाले होते. मात्र, बीड जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे 636 कोटींची मदत मिळणार आहे. पावसामुळे पीकांचे तर नुकसान झालेच होते पण शेतजमिनीही खरडून गेल्या होत्या. आता जिरायत, बागायत आणि फळपिकांसाठी वेगवेगळे निकष लावण्यात आलेले आहेत. मात्र, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीडला सर्वाधिक मदत मिळालेली आहे.
मराठवाड्यातील जिरायत क्षेत्रावरील 35 लाख 34 हजार हेक्टरावरील पीकांचे नुकसान झाले आहे तर याकरिता 3530 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. बागायत क्षेत्राचे 68 हजार 391 हेक्टरावरील नुकसान झाले असून त्यापोटी 102 कोटी रुपये मिळणार आहेत तर फळपिकांचे 50 हजार 109 हेक्टरावरील नुकसान झाले असून त्याकरिता 125 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (Compensation: Rs. 3700 crore assistance to Marathwada, highest assistance in Beed district, )
तयारी रब्बी हंगामाची : ज्वारीच्या उत्पादनाची वाढ अन् काय दुहेरी फायदा ?
गाळप हंगाम सुरु होताच ऊस वाहतूकदार, मुकादमांचा कोयता बंद मेळावा
‘अन्नत्याग’ नंतर आता लातूरात भाजपच्याच आमदाराची शेतकऱ्यांसाठी ‘पदयात्रा’