जळगाव : सोयाबीन दराची जी अवस्था (Marathwada) मराठवाड्यात आहे अगदी त्याच्या उलट स्थिती ही कापसाची (Khandesh) खानदेशात आहे. दोन्हीही पिके खरीप हंगामातील. मध्यंतरीच्या पावसाचा फटका दोन्ही पिकांनाही बसलेलाच असे असतानाही ( Increase in demand for cotton) आज (record rate of cotton) पांढऱ्या कापसाला सोन्याचा दर मिळत आहे तर दुसरीकडे सोयाबीनची कवडीमोल दरात विक्री होत आहे. गेल्या दोन महिन्यात कापसाच्या दरात 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील खेड खरेदी केंद्रावर कापसाला 9 हजार 200 रुपये प्रतिक्विटलचा दर मिळत आहे.
शिवाय दिवाळीनंतर दर झपाट्याने वाढत आहेत. 9 हजार याच दराची अपेक्षाही शेतकरी व्यक्त करीत होते. अखेर मनातला दर थेट बाजारात मिळत असल्याने कापसाची आवकही वाढली आहे. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे कापसाच्या खरेदीत अडथळा निर्माण होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण जळगाव, धुळे भागात कोरडे व निरभ्र वातावरण असल्याने कापूस प्रक्रियेत अडथळा आला नाही. यामुळे खेडा खरेदीदेखील सुरू राहिले होते.
सप्टेंबर महिन्यात कापसाला 5 हजार 200 रुपये प्रति क्विंटलचा दर होता. मात्र, यंदा उत्पादन कमी आणि मागणी अधिकची असल्याने दर वाढणार याची खात्री होती. पण अपेक्षेपेक्षा अधिक झपाट्याने कापसाचे दर वाढले आहेत. जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरु झाले की अधिक दर वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यात तब्बल 4 हजार रुपयांनी दर वाढलेले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. खेडा येथील खरेदी केंद्रावर आतापर्यंतचा उच्चांकी म्हणजे 9 हजार 200 चा दर मिळालेला आहे. कापूस खरेदीसाठी परराज्यातील व्यापारी आता खेड येथे दाखल होत आहेत. त्यामुळे अधिकची मागणी असल्याने दरात झपाट्याने वाढ होत आहे.
कापसाचे जसे दर वाढत आहेत त्याप्रमाणे आवकही वाढत आहे. 9 हजाराचा दर मिळावा ही अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीच होते. शिवाय गेल्या दोन महिन्यांमध्ये कापसाते एकदासुध्दा दर हे कमी झाले नाहीत. उलट दिवाळीनंतर दर अधिक झपाट्याने वाढत आहेत. त्याचप्रमाणे दिवसाला 1 लाख क्विंटलची आवक आता सबंध खानदेशात होत आहे. कापूस खरेदीसाठी गुजरात, मध्यप्रदेश येथील व्यापारी दाखल होत आहेत.
कापसाला जागतिक पातळीवरही मागणी वाढत आहे. जे कापूस उत्पादक देश आहेत त्यामध्ये उत्पादनात घट झाली आहे तर मागणी वाढत आहे. त्यामुळे भविष्यातही हेच दर स्थिर राहतील किंवा यामध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी दर वाढले म्हणून आवक वाढवली तर मात्र, दरावर परिणाम होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ही टप्प्याटप्प्याने करण्याचा सल्ला कृषितज्ञ हे देत आहेत. मात्र, 9 हजार अपेक्षित दर मिळाल्याने आता आवक वाढत आहे.
कांदा मार्केट सुरु पण दराचा ‘वांदा’ झाल्याने शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत
कांदा रोपाचे करा ‘असे’ व्यवस्थापन, तरच होईल ‘मर’ रोगापासून संरक्षण
सोयाबीनच्या दरावरच ठरतेय आवक, साठवणूक हाच शेतकऱ्यांकडे पर्याय