लातुर : जेवढ्या मुसळधार प्रमाणात मध्यंतरी पाऊस झाला अगदी त्या प्रमाणातच नुकसान झाल्याचे अर्ज विमा कंपनीकडे दाखल होत आहेत. नुकसानीनंतर अवघ्या 72 तासांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान झाल्याचे अर्ज हे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने दाखल करायचे होते. याकरिता वेळेचे बंधन घालून देण्यात आले असले तरी 72 तास उलटूनही अर्जांची आवक ही सुरुच आहे. आता प्रत्यक्ष पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीने कृषी तंत्रज्ञांची नेमणूक केली आहे. मराठवाड्यात उद्या (शुक्रवार) पासून प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरवात होणार असल्याचे विमा कंपनीचे प्रतिनीधी संतोष भोसले यांनी सांगितले आहे.
खरिपाचे पिक अंतिम टप्प्यात असताना झालेल्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. यानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून विमा कंपनीकडे तक्रार दाखल केल्या आहेत. लातुर जिल्ह्यातून ऑनलाईनद्वारे 70 हजार तर ऑफलाईनच्या माध्यामातून 60 हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. अजूनही तक्रार दाखल होत असल्याचे विमा प्रतिनहधी भोसले यांनी सांगितले तर नांदेड जिल्ह्यातून 73 हजार शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे केले आहेत. आता प्रत्यक्ष पंचनामे सुरु झाल्यास शेतकऱ्यांना शेतामध्ये उपस्थित रहावे लागणार आहे.
शेतकऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार विमा कंपनीचे प्रतिनीधी हे शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत. विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडे शेतकऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीची प्रत असणार आहे. त्यामुळे गट नंबर, पिकाची नोंद असणार आहे. त्यामुळे विमा प्रतिनीधीने शेतकऱ्यास संपर्क केल्यानंतर शेतकऱ्यास उपस्थित रहावे लागणार आहे.
पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आतमध्ये तक्रार नोंदवणे बंधनकारक होते. मात्र, सुरवातीच्या वेळी केवळ ऑनलाईन पध्दतच अवलंबण्यात आली होती. याची जनजागृती झाली नसल्याने अनेक शेतकरी हे अनभिज्ञ होते. तर ऑनलाईद्वारे तक्रार दाखल करायची कशी याचे ज्ञान नसल्याने उशीर झाला होता. आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने अर्ज कंपनीकडे दाखल होत आहेत. मात्र, शुक्रवार पासून प्रत्यक्ष पंचनाम्यास सुरवात होणार आहे.
पावसाने पिकाचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनीधी शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल होणार आहेत. या दरम्यान, पिकाचे किती टक्के नुकसान झाले आहे याची पाहणी करुन तसा अहवाल कंपनीला सादर केला जाणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळणार आहे. (Crop loss applications filed Now what next? Farmers will have to stay at that time)
राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध 8 हजार पानांचं आरोपपत्र, शिवाजीराव भोसले बँक घोटाळाप्रकरणात कारवाई
‘भाजपशी युती हाच पर्याय’, संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकरांची भूमिका 360 अंशात बदलली?
VIDEO : मोबाईल हवा म्हणून माकडाने दाखवला समजूतदारपणा! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!