कोल्हापूर : गेल्या काही महिन्यापूर्वी मराठवाड्यातील जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गांजाची लागवड केली जात असल्याचे उघड झाले होते. आता पश्चिम महाराष्ट्रातही गांजा लागवड केल्याचे उघड झाले आहे. (Kolhapur) कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शेतकऱ्यांने (Sugarcane farming) ऊसाच्या पिकामध्ये आंतरपिक म्हणून थेट गांजाचीच लागवड केली आहे. त्यांच्या शेतामध्ये गांजाची 490 रोपे आढळून आली होती. गांजाची शेती करणे तसा (Violation of the law) कायद्याने गुन्हा असला तरी वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी गांजाची लागवड ही करीतच आहेत. यातच ऊसाच्या फडात केलेली लागवड निदर्शनास येत नाही. मात्र, सध्या ऊसतोडणी सुरु असल्याने असे प्रकार हे समोर येत आहेत. अशाच प्रकारे सैनिक टाकळी येथे सदाशिव कोळी यांनी जवळपास 500 रोपांची लागवड केली होती. दरम्यान, त्यांच्या घरावर छापा टाकून 490 रोपे आणि लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय संशयित आरोपी सदाशिव कोळी याला ताब्यात घेतले असून कुरंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र अधिकचे आहे. या पिकाचाच फायदा घेत गांजाची लागवड केली जाते. मात्र, खबऱ्याकडून या प्रकाराबद्दल कुरंदवाड पोलीसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी छापा टाकताच सदाशिव कोळी याने ऊसाच्या फडात आंतरपिक म्हणून गांजाची लागवड केल्याचे उघड झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, शिवाजी पोलीस ठाण्याचे पो.नि. महादेव वाघमोडे यांच्यासह पथकाने गांजा लागवड केली जात असलेल्या शेतावरच छापा टाकला
सदाशिव कोळी यांनी ऊसाच्या फडात लागवड तर केली होती पण त्याची साठवणूक ही घरात करीत होते. दरम्यान, पोलीसांनी ऊसाच्या फडात पाहणी केली असता त्यांना गांजाची 490 रोपे आढळून आली त्यानंतर पोलीसांनी घरावर छापा टाकला असता लाखो रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ऊसाच्या फडात गांजाची लागवड हा विषय मात्र शिरोळ तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
Banana : केळी उत्पादकांना दुहेरी फटका, बागांचे नुकसान अन् थंडीमुळे मागणीही घटली
आढावा रब्बीचा : पीक पध्दतीमध्ये बदल, हरभराच मुख्य पीक तर ज्वारीच्या पेऱ्यात घट
Onion : कांदा लागवडीच्या योग्य पध्दती, कृषितज्ञांचा काय आहे शेतकऱ्यांना सल्ला?