नंदूरबार : “उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सरासरीच्या 30 टक्के पाऊस झाला. आता आठवडाभरात दमदार पाऊस झाला नाही, तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर येईल. अशा परिस्थितीत राज्य सरकार आणि कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे,” असं आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिलंय. कृषी मंत्री दादाजी भुसे रिसोर्स बँक प्रतिनिधींची बैठक आणि पिक पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर असताना बोलत होते (Dadaji Bhuse say loss of farmer due to wrong policy).
दादाजी भुसे म्हणाले, “उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पेरण्या झाल्या आहेत. त्याच सोबत पावसाचे प्रमाणही कमी असल्याने शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांनी या संकटातून खचून न जाता खंबीरपणे उभे राहावे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विमा कंपन्यांच्या काही चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मिळणारा परतावा कमी आहे. येत्या काळात पीक विमा योजनेत बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे.”
#धुळे कृषी मंत्री @dadajibhuse यांच्याकडून सरवड शिवारात पिकांची पाहणी. शेतकऱ्यांशी साधला संवाद. @InfoDivNashik @MahaDGIPR pic.twitter.com/zYGZaUsjmY
— DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE (@InfoDhule) July 10, 2021
“राज्य सरकार गेल्या वर्षभरापासून पिक विमा संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. जवळपास 5 हजार कोटी रुपयांच्या नियत वे येण्याचे बाकी आहे,” असंही दादाजी भुसेंनी नमूद केलं. भुसे यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना अजुनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
Dadaji Bhuse say loss of farmer due to wrong policy