मुंबई : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्यामुळे साठवलेला कांदा खराब होवून पुन्हा त्याची विभागणी करुन चांगला कांदा वेगळा करण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल होत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कांद्याला अवकाळी पावसाचा फटका बसला असून जवळपास उत्पादनांमध्ये घट झाली आहे. येवला तालुक्यातील नागडे येथील शेतकऱ्यांनी अडीच एकर मध्ये कांदा पिक घेतले मात्र अवकाळी पावसामुळे उत्पादनास फटका बसला. साठवून ठेवलेले कांदेही अवकाळी पावसामुळे खराब होत आहे. यामुळे उत्पादन खर्च देखील निघणार नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.
बदललेल्या हवामानाचा फटका हा शेतीवरही दिसू लागला आहे, यातच संपूर्ण महाराष्ट्राभर सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. काही महिन्यांआधी झालेल्या गारपीठाने बेजार झालेला शेतकरी अवकाळी पावसाला ही तोंड देत आहे. राज्यात नाशिक जिल्हात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. नाशिक मध्ये निफाड येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. मात्र सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल होत आहे.
अवकाळी पावसामुळे खराब झालेल्या कांदे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. यातच साठवून ठेवलेले कांदे ही खराब होत असल्याने त्याचीही विभागणी करुन चांगला कांदा वेगळा करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. बाजारपेठेत कांद्याला भाव मिळत नसल्याने आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्याला या दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. नाशिक जिल्हा हा नेहमीच कांदा पिकवण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. दरवर्षी मे महिन्यात कांद्याचा भाव गडगडतो, पण यावेळी कांद्याचा भाव आणखी खाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अधिक उष्ण तापमानामुळे कांदा या कांदा चाळीत साठवणे देखील कठीण होत चालले आहे. यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे. चाळीत जो कांदा सडतो, किंवा सडू शकतो असा कांदा निवडला जातो, यात शेतकऱ्यांना अधिक श्रम लागतात, पण खूप वेळ वाया जातो.
कांद्याला जेव्हा जास्त भाव असतो, तेव्हा कांद्याचे बियाणे आणि लागवडी योग्य कांद्याचे रोप देखील महाग असतं, अशी महागडी खरेदी केल्यानंतर जेव्हा कांद्याला भाव मिळत नाही, तेव्हा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो, कांद्याला खत आणि किटकनाशकांसह, मजुरीचा देखील खर्च मोठा आहे. कांद्याला पाच पैकी एका वेळेस भाव मिळू शकतो, तो देखील फार कमी प्रमाणात