PM Kisan Scheme : ‘ई-केवायसी’ साठी 31 ऑगस्टची ‘डेडलाईन’, प्रक्रिया पूर्ण केली तरच योजनेचा लाभ, नेमकी प्रक्रिया कशी? वाचा सविस्तर

| Updated on: Aug 30, 2022 | 6:07 PM

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये अशी आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे शेती व्यवसायाला हातभार तर मिळतोच पण शेतकऱ्यांनाही अर्थ सहाय्य होते. असे असले तरी मध्यंतरी शेतकरी वगळून जे या योजनेसाठी पात्र नाहीत अशा नागरिकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शणास आले होते.

PM Kisan Scheme : ई-केवायसी साठी 31 ऑगस्टची डेडलाईन, प्रक्रिया पूर्ण केली तरच योजनेचा लाभ, नेमकी प्रक्रिया कशी? वाचा सविस्तर
पीएम किसान योजना
Follow us on

मुंबई : पीएम किसान योजनेचा 12 हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना (e-KYC) ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी आतापर्यंत (Central Government) केंद्र सरकारने चार वेळेस मुदतवाढ केली होती. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बॅंके खात्याचे केवायसी केलेले नाही. जर शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण केली नाहीतर मात्र, 12 वा हप्ता (Farmer Account) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. शिवाय 12 वा हप्ता हा सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्यात मिळेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता वाढीव मुदतीही दिली जाते की नाही याबाबत साशंका आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट याच दिवशी केवायसी करणे गरजेचे आहे. आतापर्यंत यासाठी सरकारने एक ना अनेक शिबीरांचेही आयोजन केले होते. मात्र, शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला नाही.

ई-केवायसी नेमके कशामुळे?

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये अशी आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे शेती व्यवसायाला हातभार तर मिळतोच पण शेतकऱ्यांनाही अर्थ सहाय्य होते. असे असले तरी मध्यंतरी शेतकरी वगळून जे या योजनेसाठी पात्र नाहीत अशा नागरिकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शणास आले होते. त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे उत्पादनानुसार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

अशी आहे ई-केवायसी करण्याची पद्धती..!

eKYC – म्हणजे electronic know your custumer एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहणे म्हणजेच ई केवायसी आता eKYC करायची असेल तर www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.वेबसाइट ओपन झाल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला लाल अक्षरांमध्ये एक सूचना दिसेल ती अशी की eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres याचा अर्थ तुम्ही तर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.

*आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे

*आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.