पालघर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच शेती संशोधन करण्यासाठी वाव मिळावा म्हणून इस्कॉन आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात 5 वर्षांचा सामंजस्य करण्यात आला. या करारा अंतर्गत शेतीविषयी विविध प्रयोग केले जाणार आहेत. तसेच शेतीक्षेत्रात नव्या संशोधनाच्या आधारे शेतकऱ्यांचा विकास कसा होईल यावर या सामंजस्य कराराच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. (Dr Balasaheb Sawant Konkan Agricultural University have agreement with ISKCON development of farmers and research work will be done)
वाडा येथील इस्कॉन, गोवर्धन इको व्हिलेज गालतरे येथे एक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दोन्ही संस्थांचा वतीने माननीय कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, डॉ. पराग हळदणकर (संचालक कृषि संशोधन), ब्रजहरी दास आणि सनतकुमार दास यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या. या कार्यक्रमास पालघरचे खासदार राजेंद्र गावित आदी मान्यवर उपस्थितीत होते. या सामंजस्य करारामुळे पालघर जिल्ह्यातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ तसेच दापोली इस्कॉनला चांगलाच फायदा होणार आहे.
1) भाताची सेंद्रिय शेती
2) औषधीय वनस्पतींची लागवड
3) सुधारीत जातीच्या बांबूची लागवड व त्यावरील आधारित लघुउद्योग
4) बारमाही सुगंधी चाफ्याची लागवड आणि त्यापासून अत्तर निर्मिती
5) विविध फळे आणि फुलांची शेती
6) बीजबँक
7) जंगलातील औषधी/ रान भाज्या आणि खाण्यायोग्य फळांची लागवड, संरक्षण आणि संवर्धन करणे,
8) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ विकसित केलेल्या फळझाडे आणि फुलझाडे तसेच कपिला वाणाच्या गाईची जोपासना करणे.
9) या सामंजस्य करारातून वरील प्रकल्पांवर काम केले जाणार आहे. तसेच या अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांची सर्वांगीण उन्नती करणे अशी उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली आहेत.
या सामंजस्य करारांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे, त्यांच्या शेतमालाचे मूल्यवर्धन करणे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शेती संशोधनाचा प्रचार प्रसार करणे, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करविणे असे उपक्रम या सामंजस्य करारांतर्गत राबविले जाणार आहेत.
इतर बातम्या :
तांदळाच्या निर्यातीत यंदाही भारताचा दबदबा राहणार, दर घसरण्याची शक्यता
Video | खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी, लोकांना कोरोना नियमांचा विसरhttps://t.co/PT9vzhwGzQ#Pune | #corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2021
(Dr Balasaheb Sawant Konkan Agricultural University have agreement with ISKCON development of farmers and research work will be done)