सिंधुदुर्ग : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा सर्वच पिकांना बसलेला आहे. (Vegetable) भाजीपाल्याची देखील यामधून सुटका झालेली नाही. (Kokan Division) सिंधुदुर्गातील (Kokan Chilly) कोकण मिरचीला एक वेगळेच महत्व आहे. उत्पादन तर अधिक प्रमाणात घेतले जातेच पण मालवणी जेवणात या लाल तिखट लाल रंगाच्या मिरची पासूनच मालवणी मसाला बनविला जातो. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांकडे हा उत्तम पर्याय असून वर्षानुवर्ष या भागात मिरचीचे उत्पादन क्षेत्र हे वाढत जात आहे. यंदा मात्र, पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या सर्वांचाच परिणाम उत्पादनावर झालेला आहे. बदलत्या वातावरणामुळे मिरची पिकावर हुरडा नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उभे पीक नष्ट झाले आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणीची कामे केली मात्र, मिरचीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेच नाही. एकीकडे फळांच्या उत्पादनात घट होत असताना आता कोकणातील शेतकऱ्यांना इतर पिकांतूनही नुकसानच झाले आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मिरची उत्पादनाला बसला असून कोकणातील मिर्चीचे उत्पादन घेणारा शेतकरी त्यामुळे अडचणीत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची पिकावर हुरडा नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उभे पीक नष्ट झाले आहे. मिरचीचे झाड उभे सुकल्याने व आलेली मिरची ही काळपट व पांढरट रंगाची झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी यावर्षी अडचणीत आले आहेत.केवळ अवकाळी पावसामुळेच नाही तर वाढत्या थंडीचा आणि आता वाढत्या उन्हाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीचा मार्ग निवडला पण तो देखील यशस्वी होताना पाहवयास मिळत नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेतले जाते. मालवणी जेवणात या मिरचीपासून बनवलेल्या लाल तिखटा पासूनच मालवणी मसाला बनविला जातो. येथील मिरचीला वेगळीच चव असून याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. केवळ कोकणातूनच नाही तर महाराष्ट्रभरातून या लाल तिखटाला मोठी मागणी असते. तळकोकणातील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या मिर्ची उत्पादनावर चालतो.निसर्गाच्या अवकृपेमुळे तळकोकणातील मिरची उत्पादक पूर्णतः आता अडचणीत सापडले आहेत.
मिरचीचे पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ना अनेक पर्याय यांनी अवलंबले होते. किटकनाशकाचा वापर करुन शेतकऱ्यांनी पीक सावरण्याचा प्रयत्न मिरची उत्पादकांनी केला होता. मात्र, निसर्गाच्या लहरीपणापुढे बळीराजाही हताश झाला होता. आता मिरची काढणीच्या प्रसंगीच मे महिन्यात पाऊस झाल्याने मिरची उत्पादक शेतकरी पूर्णतः अडचणीत आले आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत केवळ नुकसानीचा सामना करावा लागल्याने उत्पादनात तर घट झालीच. आता त्याचा परिणाम दरावर देखील झाला आहे. अधिकच्या दराने मिरची खरेदी करुन मालवणी मसाला बनविला जात असल्याचे चित्र आहे.