सांगली : सांगलीच्या (Sangli) तासगाव (tasgaon) तालुक्यातील पेड येथील शेतकरी प्रकाश शिवाजी शिंदे यांनी कर्जबारी पणाला कंटाळून द्राक्षबाग (vineyard) तोडून टाकली आहे. वातावरणातील बदल आणि कष्ट करून फुलवलेली द्राक्षबाग तर व्यापाऱ्यांनी द्राक्षांचे पाडलेले दर या सर्वातून सतत होणाऱ्या तोट्याला कंटाळून द्राक्ष शेतीवर कुऱ्हाड चालवून आपली खंत व्यक्त केली आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे अनेक जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतीचं फक्त पंचनामा झाला आहे. अद्याप एकाही शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मदत मिळालेली नाही.
शिंदे हे गेल्या पधरा वर्षांपासून द्राक्ष शेती करत आहेत. त्यांची २० गुंठे द्राक्षबाग आहे. पण अलीकडच्या काळात वातावरणातील बदल, वाढती महागाई, दर पाडणे, फसवणूक यामुळे गेली चार ते पाच वर्षे झाली, द्राक्ष शेती तोट्यात जात आहे. यातून कर्ज भरणे सुद्धा मुश्किल झाले आहे. म्हणून नाईलाजास्तव द्राक्ष शेतीवर कुऱ्हाड चालवत असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन द्राक्ष शेती वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात शुक्रवारी दुपारी जोदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने ४७९ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले. या आपत्तीमध्ये ८३० घरांची पडझड झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. तर 30 विद्युत पोल जमीनदोस्त झाल्याने वीज वितरण कंपनीचे सुद्धा मोठ नुकसान झाले आहे. तसेच शेकडो झाडांची पडझड झाली तर दोन चारचाकी कार व 4 दुचाकी चकनाचुर झाल्यात, तर वादळी वाऱ्याने बेघर झालेल्या लोकांना तातडीने नुकसान भरपाई व शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.