ऊसतोड रखडल्याने शेतकऱ्यांनी शोधला ‘हा’ मधला मार्ग, मागणीही अन् वाढता दरही

| Updated on: Mar 08, 2022 | 9:42 AM

पश्चिम महाराष्ट्र वगळता महाराष्ट्र आणि विदर्भात सध्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने हंगामाच्या अंतिम टप्प्यातही ऊसाची तोड ही रखडलेली आहे. यामुळे ऊसाच्या वजनात तर घट होणारच आहे पण उत्पादनावरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे कधी नव्हे ते मराठवाड्यात पुन्हा गुऱ्हाळ सुरु होत असल्याचे चित्र आहे.

ऊसतोड रखडल्याने शेतकऱ्यांनी शोधला हा मधला मार्ग, मागणीही अन् वाढता दरही
मराठवाड्यात ऊस तोडणीचा प्रश्न रखडल्याने पुन्हा गुऱ्हाळातून गुळ निर्मितीला सुरवात झाली आहे.
Follow us on

नांदेड : पश्चिम महाराष्ट्र वगळता महाराष्ट्र आणि विदर्भात सध्या (Excess sugarcane) अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने हंगामाच्या अंतिम टप्प्यातही (Sugarcane Sludge) ऊसाची तोड ही रखडलेली आहे. यामुळे ऊसाच्या वजनात तर घट होणारच आहे पण उत्पादनावरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे कधी नव्हे ते (Marathwada) मराठवाड्यात पुन्हा गुऱ्हाळ सुरु होत असल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना ऊसतोडणीची प्रतिक्षा होती पण साखर कारखान्यांचे बिघडलेले नियोजन आणि ऊसाचे वाढलेले क्षेत्र यामुळे ऊस फडातच राहिल या भीतीने गुळ निर्मिती करणाऱ्या गुऱ्हाळाची संख्या ही वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न तर मिटला आहे शिवाय गुऱ्हाळ चालकांना ऊसही उपलब्ध होत आहे. एवढेच नाही तर गुऱ्हाळ चालकच ऊसतोडणी करीत करीत असल्याने साखर कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळासाठीची तोडणी परवडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रतिक्विंटल 1 हजार 800 ते 2 हजाराचा दर मिळत असून तोडणी ही गुऱ्हाळचालकांकडेच आहे.

गावरान गुळाला मागणीही अधिक

गुऱ्हाळावरील चोख व्यवहारामुळे शेतकरीही ऊस देण्यासाठी प्राधान्य देत आहेत. ऊसतोडणीचा प्रश्न रखडल्यापासून नांदेडसह परिसरात गुऱ्हाळांची संख्या ही वाढत आहे. गुऱ्हाळावर रानभेंडीचा वापर करुन नैसर्गिकरित्या गुळाची निर्मिती केली जात असल्याने ग्राहकही याच गुळाला पसंती देत आहेत. शिवाय बाजारपेठेपेक्षा थेट गुऱ्हाळाच्या ठिकाणी गुळ स्वस्तही मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मार्गी लागला असून गुऱ्हाळाच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला कामही मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले गुऱ्हाळ पुन्हा सुरु झालेले आहे.

तोडणी होताच नगदी पैसेही

कारखान्यावर ऊस घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकष्टा करावी लागते. एवढे असूनही वेळेत बिले अदा केली जात नाहीत. तर दुसरीकडे आता गुऱ्हाळ चालकांकडून ऊसाची तोड केली जात आहे. शिवाय ऊसतोड झाली की नगदी पैसे मिळत असल्याने शेतकरीही समाधानी आहे. चोख व्यवहारामुळे कारखान्याऐवजी गुऱ्हाळच परवडले अशी धारणा आता शेतकऱ्यांची होत आहे.

परस्थितीने का होईना वाढले गुळाचे उत्पादन

गुऱ्हाळ म्हणले की समोर येतो तो पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरचा परिसर. या भागात ऊसाचे क्षेत्र अधिक असल्यामुळे गुऱ्हाळांची संख्याही अधिक आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातही पाण्याची उपलब्धता झाल्याने ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. वाढत्या उत्पादनामुळे यंदा ऊसतोडीचा प्रश्न निर्माण झाल्याने कालावधी संपूनही ऊस फडातच आहे. त्यामुळे गुऱ्हाळाना चांगले दिवस आले आहेत. नांदेड जिल्ह्यात जागोजागी गावराणी गूळ निर्मिती करणाऱ्या गुऱ्हाळाची संख्या वाढली आहे.

संबंधित बातम्या:

Weather Report | राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज

Agricultural : 2050 मध्ये शेती व्यवसयाचे काय असेल चित्र? ‘आयपीसीसी’चा धक्कादायक अहवाल

उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची ‘अशी’ घ्या काळजी अन्यथा होईल नुकसान, काय आहे तज्ञांचा सल्ला?