मुंबई : दुध व्यवसाय हा शेतीचा मुख्य जोडव्यवसाय आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन तर मिळतेच शिवाय डेअरीच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम. दुधाचे उत्पन्न वाढविण्यासाठी इच्छूक असलेल्या शेतकऱ्यांसाठी हरियाना सरकारने एक हीताचा निर्णय घेतला आहे. हरियाणात 50 जनावारापर्यंतच्या दुध डेअरी उभारणीसाठी रकमेच्या 25 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल तर वाढणारच आहे शिवाय डेअरी सुरु करणाऱ्याच्या हातालाही काम मिळणार आहे.
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने राज्याची दरडोई दूध उपलब्धता वाढविणे आणि दुग्धव्यवसायातून बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवला आहे. याकरिता हरियाणा सरकारने दूध आणि डेअरीशी (डेअरी) संबंधित अनेक नवीन योजना सुरु केल्या आहेत.
एका अधिकृत प्रवक्त्याने आज सांगितले की, हायटेक मिनी डेअरी योजनेअंतर्गत सामान्य पशुपालकही या विभागाद्वारे 4, 10, 20 आणि 50 दुधाळ जनावरे असतील तर दुध डेअरी उभा करु शकतात. 4 आणि 10 जनावरे असलेल्यांसाठी डेअरी सुरू करणाऱ्यांना या विभागातून 25% अनुदान (सबसिडी) देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 20 आणि 50 दुधाळ जनावरांच्या डेअरीवर व्याज अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत अनुसुचित जातींच्या व्यक्तींना 2 किंवा 3 दुभती जनावरे घेऊन डेअरी सुरु करायची आहे किंवा डुक्कर पानलाचा व्यवसाय सुरू करायचा आहे. अशा इच्छूकांना 50% अनुदान दिले जाणार आहे. मेंढ्या किंवा शेळ्यांच्या डेअरीसाठी 90 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनांमुळे दूध उत्पादन (दूध उत्पादन) वाढेल असा विश्वास हरियाणा सरकारला आहे.
दुग्धव्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्यांना साध्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करताना कुटुंबातील सदस्यांचे आयडी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, कॅन्सल केलेले चेक आणि बँकेची एनओसी अपलोड करावी लागणार आहे.
हरियाणाचे कृषीमंत्री जे.पी.दलाल यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मस्य, पशुसंवर्धन आणि डेअरी मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्या बैठकीत हा दुध डेअरीचा मुद्दा मांडला होता. शेतकरी आपले उत्पन्न वाढवून प्रगती करु शकेल आणि शेती बरोबरच पशुपालनाच्या व्यवसायालाही चालना मिळेल हा उद्देश यामागचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय हरियाणामध्ये 16 लाख कुटूंबात 36 लाख दुभती जनावरे असल्याचेही त्यांनी सांगितले होते. (Emphasis on animal husbandry to produce milk and get work in the hands of youth)
पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया ; प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी
PM KISAN YOJNA : 7 लाख 24,000 शेतकऱ्यांनी अर्ज करुनही का मिळाले नाहीत पैसे ? जाणून घ्या