पुणे : (Onion Rate) कांद्याच्या दराचा लहरीपणा शेतकऱ्यांना माहिती असूनही दिवसेंदिवस कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कधी फायदा तर कधी तोटा हे ठरलेले असतानाही खरीप आणि (Summer Crop) उन्हाळी हंगामात या पिकाचे उत्पादन वाढत आहे. सध्या बाजारपेठेत उन्हाळी हंगामातील (Onion Arrival) कांद्याची आवक सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, सोलापूर या मुख्य बाजार समित्यांबरोबरच खेड येथील बाजार समितीच्या चाकण मार्केटध्येही कांद्याची आवक सुरु आहे. पण खरिपातील लाल कांदा संपल्यानंतर दरात सुरु झालेली घसरण अद्यापही कायम आहे. सरासरी 800 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. गेल्या 15 दिवसांच्या तुलनेत पुन्हा कांदा दरात 20 रुपयांची घट झाली आहे. विशेष म्हणजे कांद्याची आवक कमी असतना ही परस्थिती ओढावली आहे.
सध्या सर्वच हंगामी पिकांना सरासरीपेक्षा अधिकचा दर मिळत आहे. यामध्ये वाढत्या उन्हाचा प्रभाव असला तरी कांद्याने मात्र, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कारण महिन्याभरापूर्वी कांद्याचे दर हे 3 हजार रुपये क्विंटल असे होते. शिवाय खरिपातील लाल कांदा अंतिम टप्प्यात असल्याने कांद्याचे दर असेत तेजीत राहतील असे अंदाज होते. पण कांदा दराने पुन्हा आपला लहरीपणा दाखवला आहे. अवघ्या महिन्याभरातच 3 हजारावर असलेला कांदा थेट 800 रुपयांवर येऊन ठेपला आहे. शिवाय कांदा हा नाशवंत असल्याने शेतकऱ्यांना त्याची विक्री केल्याशिवाय पर्यायच नाही.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये दिवसाकाठी साधारणत: 8 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होत आहे. मात्र, बाजारपेठेत मागणीच नसल्याने कांद्याचे दर 800 रुपये क्विंटलवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतूकीचा खर्चही परवडत नाही. मात्र, कांद्याचे क्षेत्र रिकामे करुन इतर पीक पेऱ्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. गेल्या 15 दिवसांच्या तुलनेत कांदा दरात 20 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे खरिपात साधले पण उत्पादन घटले होते आता उन्हाळी हंगामात उत्पादनात वाढ झाली पण कवडीमोल दर मिळत आहे.
निसर्गाच्या लहरीपणातून ज्या शेतकऱ्यांचा खरिपाचा कांदा बचावला होता त्यांना सर्वाधिक दर मिळाला. मात्र, उन्हाळी हंगामाची सुरवात झाली दरात घसरण सुरु झाली आहे. शिवाय नाफेडनेही साठवणूकीतला कांदा बाजारपेठेत दाखल केला होता. त्याचा परिणामही दरावर झाला आहे. खरिपात उत्पादन घट तर रब्बीत कवडीमोल किंमत काहीही झाले तरी नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच होत आहे.काही शेतकरी यावर पर्याय म्हणून कांदा चाळीचा आधार घेऊ लागले आहेत.
Income Tax | श्रीमंत शेतकरी प्राप्तीकर विभागाच्या रडारवर; उत्पन्न जास्त असेल तर कर भरावा लागणार?
State Government: आता मागूनही मिळणार नाही शेततळे, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Chickpea Crop : हरभऱ्याला हमीभावाचा ‘आधार’, उत्पादन वाढूनही दर नियंत्रणात, भविष्यात काय होणार बदल?