मुंबई : बाजारपेठ आणि शेतकरी यांच्या मधला दुवा म्हणून (Farmer Producer Company) शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या काम करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीची तर सोय होत आहे पण या कंपनीच्या माध्यमातून एक मिनी बाजार समितीच सुरु राहत आहे. अशाच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वाराणसीतून सुमारे 20 हजार मेट्रीक टन शेतीमालाची (Export) निर्यात परदेशात झाली आहे. ‘अपेडा’ या सरकारी संस्थेअंतर्गत विविध कंपन्या कार्यरत असून, त्या शेतकऱ्यांना संस्थेशी जोडत आहेत. या कंपन्या या शेतकऱ्यांकडून उत्पादने गोळा करतात आणि रेल्वे मार्गाने किंवा हवाई मार्गाने अपेडाद्वारे निर्यात करतात. गेल्या वर्षभरात (Farmer) शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या अशा 10 पेक्षा अधिक कंपन्या विकसित झाल्या आहेत. त्यापैकीच त्रिसागर शेतकी एक्स्पोर्ट कंपनी असून गेल्या वर्षभरात या कंपनीला 350 शेतकरी जोडले गेले आहेत. ही शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांकडून मिरच्या, बटाटे अशी भाजीपाला पिके एकत्र करुन त्याची निर्यात केली जात आहे. त्यामुळे शेतीमालाच्या निर्यातीतून मिळत असलेल्या बाजारपेठेतून पिकालाही चांगला दर मिळत आहे. त्यामुळे पुर्वांचलसारख्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावत आहे.
त्रिसागर कृषी उत्पादक कंपनीची स्थापना होऊन वर्षभराचा कालावधी लोटलेला आहे. पूर्वांचलसारख्या भागात ही शेतकरी उत्पादक कंपनी काम करीत आहे. या कंपनीच्या माध्यमातून 350 शेतकरी जोडले गेले असल्याचे उत्पादक कंपनीचे शाश्वत पांडे यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या या कंपनीची उत्पादने आखाती देशांमध्ये निर्यात केली जातात. आतापर्यंत सुमारे २.५ दशलक्ष मेट्रिक टन भाजीपाला आखाती देशांमध्ये पाठविण्यात आला आहे. येथील शेतकरी दररोज आपल्या शेतातील माल बाजाराच्या भावापेक्षा एक रुपया अधिक भावाने उचलतात, शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. या पहिल्या टप्प्यात जवळपासच्या 10 गावांतील शेतकरी जोडले आहेत. आतापर्यंत 20 हजार मेट्रिक टन शेतीमाल निर्यात झाला आहे. तर शेकडो टन भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात आला असून, याचा थेट फायदा शेकडो शेतकऱ्यांना झाला आहे. यामुळे व्यवसयाचे वातावरण झाले असून आता शेकडो युवकांच्या हाताला काम मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी शेतकरी उत्पादक कंपनी त्रिसागर कृषी उत्पन्न कंपनी गोपीगंज भदोही यांना कृषी उद्योजक शेतकरी विकास चेंबरतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. बेस्ट इमर्जिंग फार्मर प्रोड्युसर कंपनी या श्रेणीत कंपनीला हा पुरस्कार देण्यात आला. केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते या त्रिसागर संस्थेचा सत्कार करण्यात आला.
ऊस उत्पादकांचा प्रश्न निकाली, 6 ऊसतोड टोळ्या नव्याने दाखल, कन्नड कारखान्यात कसे झाले परिवर्तन?
Drip Irrigation : ठिबकसाठी वाढीव अनुदानाची घोषणा मात्र, बांधावरची स्थिती चक्रावून टाकणारी
द्राक्षातून नाहीतर बेदाण्यातून उत्पादनवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा, व्यापारी प्रतिक्षेत