नागपूर : हिवाळ्याची चाहूल लागताच नारंगी संत्री ही बाजारात येते. अर्थात संत्री म्हणलं की (Nagpur Orange) नागपूरचीच संत्री डोळ्यासमोर येते. मात्र आता ही संत्री सातासुद्रापार जाऊन परदेशातील नागरिकांना चव चाखायला देणार आहे. अपेडा आणि भारतीय कृषी संशोधन परिषद- केंद्रीय संशोधन संस्था (Nagpur) नागपूर यांच्यात सामजस्य करार झाल्याने नागपूरी संत्री व मोसंबीच्या उत्पादनाबरोबरच आता या दोन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नागपूरी संत्री ही दर्जेदार तर आहेच पण निर्यातीसाठी लिंबूवर्गीय मूल्यवर्धन, तंत्रज्ञान विकास व प्रसाराची आवश्यकता आहे. मात्र, आता संत्रा व मोसंबीच्या दर्जेदार उत्पादनामुळे निर्यातीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. असे असले निर्यात वाढवण्यासाठी संशोधन आणि तंत्रज्ञान व प्रसाराची आवश्यकता आहे. येथील भौगोलिक स्थितीमुळे संत्राचे उत्पादन हे दर्जेदार आहे. पण त्याचे मुल्य वाढावे यासाठी आवश्यक प्रयत्न हे केले जात नाहीत. त्यामुळे मर्यादीत क्षेत्रापर्यंतच ओळख निर्माण झाली आहे. पण आता अपेडा आणि भारतीय कृषी संशोधन परिषद- केंद्रीय संशोधन संस्था नागपूर यांच्यात सामजस्य करार झाल्याने संत्री आणि मोसंबीची निर्यात केली जाणार आहे.
फळाच्या उत्पादनाबाबत योग्य मार्गदर्शनाची आवश्यकतान आहे. शिवाय निर्यात वाढवण्यासाठी संशोधन व तंत्रज्ञान वाढवावे लागणार आहे. फळ तोडणीपूर्वी व तोडणीनंतरचे व्यवस्थापन शिवाय अवशेष नियंत्रण, तोडणीनंतरचे अंतर, फळ टिकवण्याचा काळ या बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत केले तर मार्केट वाढणार आहे. त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. संत्रा फळाचे उत्पादन होत आहे पण त्याचे मर्केटींग आणि फळ सुधारित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.
उत्पादनाबरोबरच त्या फळाचा दर्जाही महत्वाचा आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक जिल्ह्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मदतीने स्थानिक स्थानिक पातळीवर त्याचा विस्तार कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यामुले टिकावू मुल्यसाखळी तयार होणार आहे. सेंद्रिय संत्रा व मोसंबी उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. याशिवाय कीड व रोग नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम हे घेतले जाणार आहेत. त्यामुळे निर्यात होणाऱ्या फळाचा दर्जा वाढणार असल्याचे मत आयसीआरचे संचालक डॅा. दिलीप घोष यांनी व्यक्त केले आहे.
*आयसीआर व सीसीआरआय या दोन्ही संस्थाच्या माध्यमातून ही दोन फळे जागतिक बाजाराशी जोडली जाणार आहेत. त्यातून इतर उत्पादनास मदत होणार आहे.
* जागतिक पातळीवर ‘ब्रॅंड इंडिया’ स्थापन करुन या फळांचा दर्जा वाढवला जाणार आहे. जेणे करुन निर्यातीला मदत होणार आहे.
* या दोन्ही फळांचा बाजारातील विस्तार व विकास करुन ब्रॅंडिंग, पॅकिंग, बाजार व व्यापार कौशल्य, उत्पादन, व्यापार निर्यातीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
* तांत्रिक कौशल्य वाढवणे प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणे, आयात करणाऱ्या देशांच्या गरजेनुसार त्यांना माल पोहचवणे हा या कराराची वैशिष्टे आहेत. (Export of Nagpuri Orange-Mosambi; Agreement paves way)
‘ई-पीक पाहणी’ न केल्यास काय होणार ? मुदतीमध्ये आणखीन वाढ
मशागत करताना औतासमोर शेळ्यांचा कळप आला अन् दुर्घटना घडली…
सलग दोन दिवस बाजार बंद नंतर काय आहे सोयाबीनचा दर ? आवक मात्र विक्रमी