लातुर : सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला मराठवाड्यातह सबंध राज्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसानही झाले आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पावसाने मराठवाड्यात उघडीप दिलेली आहे. एवढेच नाही तर यंदा परतीचा पाऊसही लांबणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपातील पिके काढणीसाठी दिलासा मिळणार आहे. दरवर्षी परतीच्या पावसामुळे पिके पाण्यात असतात. यंदा मात्र परतीचा पाऊस लांबणार असल्याने पिकांची काढणी करता येणार आहे.
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी परतीच्या पावसाचा प्रवास हा सुरु होतो. यंदा मात्र, राज्यस्थानातूनच 15 दिवसांनी उशिरा परतीचा पाऊस प्रवास हा सुरु करणार आहे. त्यामुळे राज्यातही हा पाऊस उशिरा दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांना खरिप हंगामातील रखडलेली कामे मार्गी लावता येणार आहेत. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनात तर घट ही होणारच आहे पण वावरात जे पिक आहे ते पदरात पाडून घेण्यासाठी या कालावधीत पावसाने उघडीप देणे आवश्यक आहे.
यातच 17 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतू, राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊत वगळता वातावरण हे कोरडे राहणार आहे. सध्या शेतशिवारात खरिपातील उडीद काढणीची कामे सुरु आहेत. अशीच पावसाची उघडीप राहिली तर शेतकऱ्यांना ही कामे उरकती घेता येणार आहेत. खरिपातील सोयाबीन काढणीस अजूनही 15 दिवसाचा कालावधी आहे. दरवर्षी परतीच्या पावसामुळेही खरिपातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीनचे नुकसान हे ठरलेलेच आहे. यंदा काढणीच्या प्रसंगी उघडीप दिली तर मध्यंतरीच्या पावसाच्या तडाख्यातून बचावलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.
गेल्या पाच वर्षापासून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसच परतीच्या पावसाला सुरवात झालेली होती. 2019 मध्ये मात्र, ऑक्टोंबरमध्ये परतीचा पाऊस हा दाखल झाला होता. यंदाही 15 दिवसाने उशिरा हा पाऊस दाखल होणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना रखडलेली कामे मार्गी लावता येणार आहेत.
गतवर्षीही सोयाबीन हे जोमात होते. ऐन काढणीच्या प्रसंगी पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन कवडीमोल दराने विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती. 15 दिवसांपुर्वी सोयाबीनचे दर हे 10 हजारांवर गेले होते. बदलत्या वातावरणानुसार दरामध्ये बदल होत आहे.
यंदा अनियमित वेळी पाऊत होत आहे. यापुर्वीच वावरात पिक असताना झालेल्या पावसामुळे उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे. शिवाय परतीच्या पावसामुळे पिकाची काढणीही करता येत नाह. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याची अनुभुती आहे. त्यामुळे पाऊस हा लांबणार असला तरी काढणी झाली सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. अधिकचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे अवाहन लातुरचे जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
दानवे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, उद्धव म्हणाले, शब्द दिला!
LIVE : संत विद्यापीठ ते शिर्डी-औरंगाबाद हवाई प्रवास, मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात पहावं लागेल, राऊतांचा चिमटा घेत मोदींचं तोंडभरू स्तुती