लातुर : पावसाने खरिप पिकांचे नुकसान आता आठ दिवसाचा कालावधी लोटलेला आहे. नुकसानीनंतर अवघ्या 72 तासांमध्ये शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार नोंदवण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. मात्र, ऑनलाईन, ऑफलाईन आणि इतर चार पध्दतीमुळे शेतकऱ्यांचा गोंधळ उडाल्याने अजूनही नुकसानीच्या तक्रारी ह्या दाखलच होत आहेत. नियमित वेळी तक्रार दाखल करणे ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे तर दाखल झालेल्या तक्रारीवर त्वरीत कारवाई करणे हे विमा कंपनीला बंधनकारक आहे. आता शेतकऱ्यांची जबाबदारी आणि विमा कंपनीची अट यामध्येच नुकसानीपोटी मिळणारी रक्कम अडकणार का ? असा सवाल शेतकऱ्यांना पडलेला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे तब्बल मराठवाड्यातील 4 लाख हेक्टरावरील पिके ही बाधित झाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी केवळ ऑनलाईनच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्याचा नियम लादला. मात्र, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करवा लागत असल्याने कृषी उपसंचालक कार्यालयाने यामध्ये हस्तक्षेप करीत ऑफलाईसह इतर चार पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले. तोपर्यंत विमा कंपनीने दिलेला आवधी संपलेला होता. असे असतानाही अजूनही तक्रारी घेणे हे सुरुच आहे.
शुक्रवारी लातुर जिल्ह्यातील निलंगा येथे तक्रार दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी झाली होती. तर दुसरीकडे शेतकऱ्याची तक्रार दाखल होताच त्यावर कारवाई करण्याची अट ही विमा कंपनीवर आहे. आता अतिवृष्टी होऊन आठ दिवस उलटले आहेत. सध्या विमा कंपनीचे प्रतिनीधी जिल्ह्याची ठिकाणी दाखल झाले आहेत. परंतू, अद्यापही तक्ररारीच स्वीकारत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे कधी होणार आणि नुकसान भरपाई केव्हा दिली जाणार याबाबत प्रश्नचिन्ह हे कायम आहे.
लातुर जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून प्रत्यक्ष पंचनामे सुरु होणार असल्याचे विमा प्रतिनीधी संतोष भोसले यांनीच स्पष्ट केले होते. मोठ्या प्रतिक्षेनंतर का होईना पंचनामे होणार म्हणून शेतकरी हे शेतााध्येच थांबून होते. मात्र, दुपारी 3 पर्यंत पंचनाम्याला सुरवातही झालेली नव्हती. शिवाय अजून दोन दिवस शेतकऱ्यांना वाट पहावी लागणार असल्याचे विमा प्रतिनीधी संतोष भोसले यांनी सांगितले आहे.
पावसाने सरसकट पिकाचे नुकसान झाले आहे हे स्पष्ट आहे. पण ऑनलाईन, ऑफलाईन असे वेगवेगळे पर्याय देऊन शेतकऱ्यांची दिशाभुल केली जात आहे. प्रत्येक गावातून 500 ते 700 हेक्टरावरील पिक नुकसानीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सर्वांचे केव्हा पंचनामे होणार आणि शेतकऱ्यांच्या पदरी केव्हा रक्कम पडणार हे अजूनही स्पष्ट नाही. शिवाय तक्रार दाखल करण्यास विमा कंपनीच जबाबदार आहे. वेळोवेळी नियमात बदल झाल्यानेच उशीर झाल्याचे मत नेकनूरचे शेतकरी संजय शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
तयारी रब्बी हंगामाची ; ज्वारी उत्पादन वाढीसाठी अशी करा पुर्वतयारी
ढगाळ वातावरणामुळे खरिपातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल
पावसाची उघडीप ; परतीचा मान्सूनही लांबणार असल्याने खरिप काढणीसाठी शेतकऱ्यांना दिलासा