ऊसाला कांदा भारी, कशामुळे होतोय पश्चिम महाराष्ट्रात पीक पध्दतीमध्ये बदल?

| Updated on: Dec 18, 2021 | 12:25 PM

काळाच्या ओघात शेतकरी देखील कमर्शिअल होत आहे. ऊस हे सर्वात मोठे पिक असताना देखील यंदा बदलत्या वातावरणामुळे ऊसाला फाटा देत शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऊस हे मुख्य पिक आहे. परंतू, सध्याची बदलती परस्थिती आणि भविष्यातील दराचे विचार करता अहमदनगर जिल्ह्यात ऊस लागवडीपेक्षा कांदा उत्पादनावरच अधिक भर दिला जात आहे.

ऊसाला कांदा भारी, कशामुळे होतोय पश्चिम महाराष्ट्रात पीक पध्दतीमध्ये बदल?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

अहमदनगर : काळाच्या ओघात शेतकरी देखील कमर्शिअल होत आहे. ऊस हे सर्वात मोठे पिक असताना देखील यंदा बदलत्या वातावरणामुळे ऊसाला फाटा देत शेतकरी (Onion crop) कांदा लागवडीवर भर देत आहे. (West Maharashtra) पश्चिम महाराष्ट्रात ऊस हे मुख्य पिक आहे. परंतू, सध्याची बदलती परस्थिती आणि भविष्यातील दराचे विचार करता अहमदनगर जिल्ह्यात ऊस लागवडीपेक्षा कांदा उत्पादनावरच अधिक भर दिला जात आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता हे नुकसान नगदी पिकातून भरुन काढण्याचा निर्धारच शेतकऱ्यांनी केला आहे.

पोषक वातावरण अन् चार महिन्यात पीक पदरात

मध्यंतरी अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शिवाय कांद्याच्या रोपावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, आता पावसाने उघडीप दिली आहे. शिवाय 15 ते 30 डिसेंबर दरम्यान कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याचे कृषी विभागानेच सांगितले आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणाहून कांद्याचे रोप घेऊन लागवडीवर शेतकरी भर देत आहेत. दरवर्षी नगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जायकवाडी बॅकवॅाटरच्या क्षेत्रातील अनेक गावांमध्ये ऊसाच्या लागवडीची लगबग सुरु असते पण आता ऊसाला बाजूला सारुन कांदा लागवडीवर भर आहे.

पाण्याचाही मुबलक साठा

पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी हा पाऊस रब्बी आणि हंगामी पिकांसाठी उपयोगी ठरत आहे. जलसाठ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने शेतीसाठी असलेले राखीव पाणी देण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलेला आहे. सध्या कांद्याच्या दरात चढ-उतार होत असला तरी अनेक क्षेत्रावरील रब्बी कांद्याचे नुकसान हे पावसामुळे झाले आहे. घटत्या उत्पादनामुळेच दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना असल्यानेच कांदा लागवडीवर भर दिला जात आहे. त्यामुळे यंदा तर निसर्गाने साथ दिली तर ऊसाच्या तुलनेत कांद्यातून अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. सध्याचे पोषक वातावरण आणि कांदा दराबाबत आशादायी चित्र यामुळेच कांद्याच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे.

कांदा पिकाचे असे करा व्यवस्थापन

लागवडीपासून काढणीपर्यंत कांदा पिकाची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हे पीक कमी कालावधीचे असून रोगाचा प्रादुर्भाव झाला तर थेट परिणाम हा उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे बुरशीनाशकाचा वापर करणे हे अनिवार्यच राहणार आहे. पावसानंतर जे लिक्विड स्वरुपात बुरशीनाशक बाजार उपलब्ध आहेत त्यांचाच वापर फायद्याचा राहणार आहे. यामध्ये झोल ग्रुपचे बुरशीनाशक अधिकेचे परिणामकारक राहणार आहेत.

संबंधित बातम्या :

Rabi Season : काय सांगता ? रब्बीत काळ्या गव्हाचा पेरा, शेतकऱ्याच्या नव्या प्रयोगाचे कृषी विभागालाही कुतूहल

शेतकऱ्यांनो केवळ तक्रारी करा, थकीत ‘एफआरपी’ तो ही व्याजासकट पदरात पडेल

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली अन् खिलार बैलांची हजारांची किंमत लाखोंवर पोहचली