तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बियाणे कंपनीने फसवणूक केली आहे. 145 दिवसात निघणारी दफ्तरी कंपनीचं 1008 वाणाचे बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करत लागवड केली खरी मात्र 90 दिवसात पीक आल्याने, शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक बियाणे कंपंनीने केली आहे. पावसाळा लागताच शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामाला लागतो. सर्वात आधी शेतकरी आपल्याला चांगला उत्पादन होईल म्हणून चांगल्या प्रतीच्या बियाणे खरेदी करून त्याची पेरणी करतात. तर या वर्षी सालई खुर्द गावातील शेतकऱ्यांनी दफ्तरी कंपनीची 145 दिवसांच्या कालावधीत निघणाऱ्या 1008 वाणाच्या बियाणाची खरेदी करत शेतात पेरणी सुद्धा केली मात्र आता ९० दिवसात पीक निघालं तेही अर्धवट… त्यामुळे दफ्तरी कंपनीने आपली फसवणूक केली असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनात आले आहे.
ज्या शेतीमध्ये मुबलक पाणी साठवून राहतो त्या शेतात जास्त कालावधीत निघणारं पीकाची लागवड केली जाते मात्र आता हेच पीक लवकर आल्याने शेतकरी धानाची कापणीही करू शकत नाही. ही परिस्थिती एकट्या गावाची नसून संपूर्ण तालुक्यात हीच परिस्थिती आहे.
बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार दिली असून दफ्तरी कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकर्यानी केली आहे.
तर संदर्भात कृषी विभागामार्फत शेतावर जाऊन चौकशी करण्यात येणार आहे, जर शेतकऱ्यांनी पेरलेली बियाणे बोगस निघाली तर संबंधित कंपनीवर कारवाईकरिता तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोयबीनच्या दरात झपाट्याने घसरण, शेतकऱ्यांचे लक्ष लातुरच्या बाजारकडे
अगोदरच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी मेटाकूटीला आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना किमान बाजार भावाचा तरी आधार मिळेल अशी आशा होती. मात्र, बाजारातही सोयाबीनचे दर दिवसेंदिवस हे घटत आहेत. दोन दिवसात तब्बल दोन हजाराने सोयाबीनचे दर हे घटले आहेत. आता आवक वाढण्यास सुरवात झाली असल्यानेच दर घसरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भविष्यात काय दर राहतील याची धास्ती शेकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
आतापर्यंत हिंगोली, बार्शी आणि अकोला या बाजार समितीाध्ये सोयाबीनला विक्रमी दर मिळाल्याच्या पावत्या सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या होत्या. सोयाबीनला या बाजार समितीमध्ये 11 हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला होता. मात्र, हा दर मुहूर्ताच्या सोयाबीनला देण्यात आला होता. परंतु गेल्या चार दिवसांपासून लातुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक हा वाढत आहे. त्यामुळे आता खरा दर सोयाबीनला मिळत असल्याचे चित्र आहे. शनिवारी सोयबीनला प्रति क्विंटल 8375 रुपये असा दर होता तर सोमवारी मात्र, 6291 रुपयांवर सोयबीन आलेले आहे.
(Fraud from seed companies, farmers complaints to agriculture department, demand for compensation)
हे ही वाचा :
आंब्याच्या बागेतील रिकाम्या जागेत करा हळदीचे लागवड अन् मिळवा लाखोंचे उत्पन्न
केंद्रसरकारच्या महत्वदायी सौर कृषीपंप ‘कुसुम’ योजनेची राज्यातील स्थिती, योजनेला प्रारंभ