सोलापूर : शेतीमाल विक्रीच्या साखळीतून शेतकरी केव्हाच गळून पडलेला आहे. बाजारपेठेची सुत्रे ही व्यापाऱ्यांनी हाती घेतली असून शेतीमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्यालाच त्याच्या (Agricultural prices) मालाची किंमत ठरविता येत नाही त्यापेक्षा दुर्भाग्य ते काय? सध्याच्या वाढत्या उन्हात चर्चा रंगतेय ती (Lemon) लिंबाच्या दराची. (Seasonable Crop) हंगामी पिकातून शेतकरी मालामाल, लिंबातून लाखोंचे उत्पन्न हे केवळ ऐकण्यासाठी ठिक आहे पण स्थानिक पातळीवरची परस्थिती काही वेगळीच आहे. कारण सध्याच्या बाजारपेठेतील दराच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या पदरी निम्माच दर पडत आहे. बदलते वातावरण, घटलेली मागणी याखाली व्यापारी जेमतेम 100 रुपये किलोने लिंबाची खरेदी करतात आणि हाच माल 250 रुपये किलोने मुख्य बाजारपेठेत विकला जात आहे. शिवाय वाढीव दर मिळत असला तरी वातावरणातील बदलामुळे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराचा ना नफा ना तोटा पण व्यापारी अन् किरकोळ व्यापारी मात्र, मालामाल झाले आहेत.
व्यापारी ठरवतेल तोच शेतीमालाचा दर अशी आजची आवस्था आहे. केवळ लिंबूच नाही तर खरबूज, कलिंगड याचीही अशीच अवस्था आहे. वातावरणातील बदलामुळे लिंबाच्या दरात वाढ होणार हे शेतकऱ्यांनाही अपेक्षित होते. शिवाय वाढत्या उन्हामुले अपेक्षेपेक्षा अधिकचा दर मार्च महिन्यात मिळाला. पण आता वातावरणातील बदल, ढगाळ वातावरण आणि घटलेली मागणी अशी कारणे सांगत व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने लिंबाची खरेदी करीत आहेत तर मुख्य बाजारपेठेत खरेदीच्या तिप्पट दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे बाजारपेठेची सुत्रे ही व्यापाऱ्यांनीच हातामध्ये घेतली आहे.
बाजार समितीमध्ये खरेदी-विक्री होणाऱ्या शेतीमालावर समितीचा अंकुश असतो. पण या फळ मार्केटवर कुणाचाच अंकुश राहिलेला नाही. व्यापारीच मनमानी दर ठरवून अप्रत्यक्ष शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. शिवाय एकदा आणलेला माल शेतकरी परत घेऊन जात नाही याची माहिती असल्याने वाटेल त्या किंमचतीमध्ये त्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे लिंबाचे दर वाढले तरी शेतकऱ्यांना याचा फायदा न होता मध्यस्थीच लाभ घेत असल्याचे सोलापूरचे शेतकरी सागर गायकवाड यांनी tv9 मराठी शी बोलताना सांगितले.
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि मुख्य बाजारपेठांमध्ये होत असलेली मागणी याचा फायदा व्यापारी घेत आहेत. मुख्य बाजारपेठेत उत्पादन घटल्याचे सांगत अधिकचा दर मिळवला जात आहे तर दुसरीकडे लिंबाला मागणीच नसल्याचे शेतकऱ्यांना सांगत कवडीमोल दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी यांच्यातील दुवा असलेला व्यापारीच आज मालामाल होत असल्याचे चित्र आहे. सोलापूर, मोहोळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून लिंबाची आवक ही मुंबई बाजारपेठेत होत आहे.
Watermelon : कलिंगडला ‘विकेल ते पिकेल’ अभियानाचा आधार, शेतकऱ्यांनी कसा घ्यायचा लाभ? वाचा सविस्तर
Success Story : पानमळ्याने फुलले शेतकऱ्यांचे जीवन, 20 गुंठ्यामध्ये 10 कुटुंबाचा उदरनिर्वाह
Kharif Season : खत पुरवठ्यापासून पेरणीपर्यंत कृषी विभागाचे नियोजन, शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?