लातुर : नुकसानभरपाई देण्याची वेळ आली की, विमा कंपन्यांची चालढकल हे काय नविन नाही. यातून कायम शेतकऱ्यांचे हे नुकसानच झाल्याचे समोर आले आहे. मात्र, लातुरातील शेतकऱ्यांच्या (latur) बाबतीत हे जरा उलट झालयं… गतवर्षी पावसाने आणि वादळी वाऱ्यामुळे (Loss of mangoes) आंबा उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले होते. मात्र, शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आतमध्ये विमा कंपनीकडे ना ऑनलाईन तक्रार केली ना ऑफलाईन असे असातानाही आता या आंबा उत्पादकांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी.पी. सिंह यांनी दिले आहेत. त्यामुळे आता आंबा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
सध्या ग्रामीण भागात आणि शेतशिवारात एकच चर्चा आहे ती म्हणजे पिकांच्या नुकसान भरपाईबाबतची. एकीकडे खरिपातील नुकसानभरपाईकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले असताना मात्र, जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील आंबा उत्पादकांना प्रशासनाने दिलासा दिलेला आहे. गतवर्षी अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या शिवारात वाऱ्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार ही 72 तासाच्या आतमध्ये विमा कंपनीकडे केलीच नव्हती. हाच मुद्दा घेऊन विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात होती.
अखेरीस या बागायत शेतकऱ्यांनी थेट प्राधिकरण विभागाकडे तक्रार केली होती. परंतु, कोरोनामुळे याबाबतची सुनावणी रखडलेली होती. शिवाय नुकसान भरपाईबाबत कोणत्याही सुचना कंपनीली देण्यात आलेल्या नव्हत्या. येथील स्वयंचलित हवामान केंद्रावर वाऱ्याचा वेग 25 किमी प्रतितास असल्याचे ज्या मंडळात आढळून आले आहे त्या भागातील आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले आहेत. त्यामुळे उशिरा का होईना मदत ही शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. लातुर जिल्ह्यातील इतर भागात तुजपुंजी मदत ही मिळालेली होती परंतु अधिकचे शेतकरी हे मदतीपासून वंचित होते.
एकीकडे हवामान आधारीत फळपिकंची लागवड करण्याचा सल्ला प्रशासनाकडूनच दिला जात आहे तर दुसरीकडे याचे निष्कर्ष लावून लागवड केली तरी फळबागांचे नुकसान हे होतच आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.
फळ किंवा पिकाचे नैसर्गिक नुकसान झाल्यास केवळ 72 तासाच्या आतमध्ये त्याची तक्रार ही संबंधित विमा कंपनीकडे नोंदवायची हा नियम आहे. मात्र, गतवर्षी कोरोनाची प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होता. शिवाय विमा कंपनीची कार्यालये ही तालु्क्याच्या ठिकाणी नव्हती ती तर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याबाबत जनजागृतीही नसल्याने शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली नव्हती.
विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ होत असल्याने फळ उत्पादकांनी प्राधिकरण विभागाकडे तक्रार केली होती. गतवर्षी कोरोनाचे धोका अधिक होता. त्यामुळे याबाबच निर्णय झाला नव्हता. आता प्राधिकरण विभागामार्फत सुचना आल्याने जिल्हाधिकारी यांनी नुकसान भरपाईबाबत विमा कंपनीला आदेश दिले आहेत.
वादळी वाऱ्यामुळे हाडोळती परिसरातील आंब्याचे पडझड झाली होती. त्यावेळी विमा कंपनीकडून काही शेतकऱ्यांना मदतही दिली. मात्र, नुकसानीचा आकडा वाढताच दुर्लक्ष केले. त्यामुळे बांधलगतच्या शेतकऱ्याला मदत मिळली तर काही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. (Fruit growers get relief, compensation after loss year)
पुण्यात तहसीलदाराला ‘गुगल पे’वरुन जबरदस्तीने 50 हजाराची लाच देणाऱ्या दोघांना अटक
मुलगी नव्हे, 12 वर्षाच्या मुलावर शेतात नेऊन अतिप्रसंग, वासनांध नराधमाच्या मुसक्या आवळल्या