बीड : शेती व्यवसायातून अधिकचे उत्पन्न मिळत नाही म्हणून मराठवाड्यात विशेषत: (Beed) बीड जिल्ह्यामध्ये (Cannabis field) गांजा शेतीचे प्रमाण वाढत आहे. मध्यंतरीच परळी तालुक्यातील घटना उघड झाली असताना आता गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच (Police) पोलीस उपअधिक्षक यांनी शेतामध्ये जाऊन छापा टाकला आहे. यामध्ये 22 किलो गांजाची झाडे ताब्यात घेण्यात आली असून शेती मालक बाळू खवाटे यालाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 2 वर्षापूर्वी या गाव शिवारात गांजाची लागवड केल्याचे उघड झाले होते. कमी कालावधीत अधिकचे उत्पन्न मिळवण्यासाठी अशा गैरमार्गाचा अवलंब केला जात आहे.
गांजाची लागवड ही अधिकतर उसातच केली जाते. यामध्ये गांजा लावला आहे हे लक्षात येत नाही म्हणून हा मार्ग शेतकरी अवलंबतात. मात्र, सध्या उसतोड सुरु असून शिवार रिकामा होत आहे. अशातच तलवाडा येथील बाळू खवाटे यांच्या शेतामध्ये उसापेक्षा गांजालाच अधिकची वाढ होती. गांजाची झाडे ही 5 ते 6 फुटावर गेली होती. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी खवाटे यांच्या शेतात छापा मारुन गांजाची झाडे ताब्यात घेतली आहेत.
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील बाळू खवाटे यांची त्वरितादेवी मंदिराच्या पायथ्याशी जमिन आहे. त्यांनी उसाच्या क्षेत्रात काही अंतरावर या गांजाची लागवड केली होती. एवढ्या दिवस लगतही ऊस असल्याने ही बाब निदर्शनास आली नाही पण आता उसतोड होताच हा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी थेट खवाटे यांचे शेत जवळ केले. यामध्ये गांजाची 18 किलो वजनाची 22 झाडे तर जप्त केलीच पण बाळू खवाटे यांनाही अटक झाली आहे.
उसाची तोड होताच गांजा शेतीचे प्रकार हे समोर येतातच. यापूर्वीही तलवाडा शिवारातच गांजाच्या शेती केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. कमी काळाच अधिकचे उत्पन्न या उद्देशाने हे प्रकार वाढत आहेत.
Milk Production: दुधाचे दर वाढले अन् उत्पादन घटले, वाढत्या उन्हाचा नेमका परिणाम काय?
Orchard : प्रतिकूल परस्थितीमध्येही आंबा लागवडीलाच प्राधान्य, योजनेचा लाभ घेऊन पीक पध्दतीमध्ये बदल
Goat rearing : जातिवंत शेळ्यांसाठी कृत्रिम रेतन, देशातील पहिलाच प्रयोग महाराष्ट्रात