नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2021-22 च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादकांना त्यांच्या उत्पन्नाच्या मोबदल्याची रास्त किंमत मिळावी, या उद्देशाने सरकारने खरीप पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तीळ 452 रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर तूर आणि उडीद 300 रुपये प्रति क्विंटलसाठी करण्यात आली आहे.
भूईमूग किंवा शेंगदाणा आणि नाचणी बाबतीत गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 275 आणि 235 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.विविध प्रकारच्या पिकांची लागवड व्हावी म्हणून वेगवेगळ्या पिकांसाठी वेगळी एमएसपी जाहीर करण्यात आली आहे.
पीक | 2020-21 ची किमान आधारभूत किंमत | 2021-22 ची किमान आधारभूत किंमत | 2021-22 साठी उत्पादन खर्च | किमान आधारभूत किंमत वाढ |
---|---|---|---|---|
भात | 1868 | 1940 | 1293 | 72 |
भात ग्रेड अ | 1888 | 1960 | - | 72 |
ज्वारी संकरीत | 2620 | 2738 | 1825 | 118 |
ज्वारी मालदांडी | 2640 | 2758 | - | 118 |
बाजरी | 2150 | 2250 | 1213 | 100 |
नाचणी | 3295 | 3377 | 2251 | 82 |
मका | 1850 | 1870 | 1246 | 20 |
तूर | 6000 | 6300 | 3886 | 300 |
मूग | 7196 | 7275 | 4850 | 79 |
उडीद | 6000 | 6300 | 3816 | 300 |
भूईमूग | 5275 | 5550 | 3699 | 275 |
सूर्यफूल | 5885 | 6015 | 4010 | 130 |
सोयाबीन | 3880 | 3950 | 2633 | 70 |
तीळ | 6855 | 7307 | 4871 | 452 |
कारळे | 6695 | 6960 | 4620 | 235 |
कापूस मध्यम | 5515 | 5726 | 3817 | 211 |
कापूस मोठा | 5825 | 6025 | - | 200 |
2021-22 साठी खरीप पिकांसाठी एमएसपीमधील वाढ अखिल भारतीय स्तरावरीलसरासरी उत्पादन खर्चाच्या (सीओपी) किमान 1.5 पट पातळीवर एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणेनुसार एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. शेतकर्यांना वाजवी मानधन मिळावे या उद्देशाने एएमसपीमध्ये वाढ करण्यात आलीय. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना अपेक्षित सर्वाधिक परतावा बाजरी (85%), उडीद (65%) आणि तूर (62%) या पिकांवर अंदाज आहे.
अंबरनाथमध्ये पहिलाच पाऊस, शेकडो जखमा, कुठे भिंत कोसळली, तर कुठे नाल्याचं पाणी सोसायटीत शिरलंhttps://t.co/5OVNEw2aBd#Rain #RainUpdate #Ambernath #AmbernathRainUpdate #Kalyan #Thane #Mumbai #HeavyRain #WeatherAlert
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2021
खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरासरी 80 ते 100 मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. जो पर्यंत 80 ते 100 मि.मी पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
जो पर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये 80 ते 100 मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. यापेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्याने जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व बियाणे जळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येवू शकते, असं शंकर तोटावार म्हणाले.
संबंधित बातम्या:
कृषिपंपाना त्वरित वीज जोडण्या द्या, एचव्हीडीएस योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करा : नितीन राऊत
शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी करावी? कृषी विभागाचा मोलाचा सल्ला
Government of india has approved the increase in the Minimum Support Prices for various crops