सांगली : अवकाळी पावसामुळे जसा आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे अगदी त्याप्रमाणेच ( Vineyards) द्राक्षाचेही झाले आहे. (Untimely Rain) पावसाने द्राक्षाचे नुकसान तर झालेच पण वाढलेल्या थंडीमुळे या पिकाची फुगवण थांबली आहे. यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बाजारपेठेत दाखल होणारी द्राक्ष अद्यापही झालेली नाहीत. द्राक्षाचा हंगाम महिनाभर लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता त्याचा दरावर काय परिणाम होणार हे देखील पहावे लागणार आहे. (Sangali District) सांगली जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष हंगाम सुरू होतो. त्यामुळे द्राक्ष खरेदीसाठी मुंबई, कोलकाता, बंगळूर, दिल्ली येथील द्राक्ष व्यापारी मोठ्या संख्येने दाखल होतात. यंदाच्या परस्थितीमुळे व्यापारीही दाखल झालेले नाहीत.
सांगली जिल्ह्यामध्ये दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच द्राक्ष हंगाम सुरु होत असतो. यंदाही सर्वकाही पोषक वातावरण होते. मात्र, ऐनवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि बागांचे नुकसान झाले. या पावसामुळे द्राक्ष ही बागेवरच कुजली गेली. त्यामुळे नोव्हेंबरच्या महिन्यात द्राक्ष ही बाजारातच आली नाहीत. वर्षभर जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे बागांची जोपासना केली मात्र, तोडणी महिन्याभरच राहिली असताना अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
जिल्ह्यात नोव्हेंबरच्या मध्यवर्ती द्राक्ष हंगाम सुरू होतो. त्यामुळे महाराष्ट्रासह परराज्यातील व्यापारी मोठ्या संख्येने सांगली जिल्ह्यात दाखल होतात. सुरुवातीला व्यापारी आल्याने स्पर्धेतून दर मिळतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळतो. मात्र यंदा हंगाम उशिरा सुरू होत असल्याने व्यापारी अजून दाखल झाले नाहीत. जानेवारीच्या मध्यवर्ती व्यापारी येतील, अशी शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मध्यंतरीच्या अवकाळीनंतर बागांवर डाऊनी मिल्ड्यू चा प्रादुर्भाव वाढला होता. या रोगाचा परिणाम थेट द्राक्षांच्या घडावर होत आहे. त्यामुळे वेळेत उपाययोजना केली नाही तर थेट द्राक्ष तोडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. असे प्रकार पंढरपूर, सोलापूर सांगली येथे घडलेले आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकरी 10 हजाराचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला आहे. असे असताना अता हंगाम लांबल्याने त्याचा दरावर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.