फरदड टाळा अन् आगामी हंगामातील उत्पादन वाढवा, कापूस उत्पादकांसाठी महत्वाची माहिती

| Updated on: Dec 21, 2021 | 8:09 AM

वातावरणातील बदलामुळे यंदा कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. असे असतानाच दुसरीकडे कापसाचे दर वाढत असल्यामुळे शेतकरी हे फरदड उत्पादन घेत आहे. मात्र, या उत्पादनामुळे काही प्रमाणात फायदा होणार असला तरी भविष्यात मोठे नुकसान होणार आहे.

फरदड टाळा अन् आगामी हंगामातील उत्पादन वाढवा, कापूस उत्पादकांसाठी महत्वाची माहिती
कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
Follow us on

लातूर : (Climate change) वातावरणातील बदलामुळे यंदा कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. असे असतानाच दुसरीकडे कापसाचे दर वाढत असल्यामुळे शेतकरी हे फरदड उत्पादन घेत आहे. मात्र, या उत्पादनामुळे काही प्रमाणात फायदा होणार असला तरी भविष्यात मोठे नुकसान होणार आहे. अधिकचा काळ कापूस पीक वावरात ठेवले तर (Outbreak of bond larvae) बोंडअळीचे जीवनचक्र हे वाढतच जाते. डिसेंबर – जानेवारी महिन्यात कापसाची काढणी केली तर पुढील 5 ते 6 महिने (Cotton) कापसाचे क्षेत्र हे रिकामे राहून बोंडअळी ही संपुष्टात येणार आहे. कापूस लागवडीपेक्षा ही प्रक्रिया महत्वाची आहे. त्यामुळे कापसावरील वाढता प्रादुर्भाव तर संपुष्टात येणारच आहे पण शेतजमिनीवरही काही दुष्परिणाम होणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गेल्या पाच महिन्यापासून असलेल्या कापसाची काढणी केली पाहिजे.

का घेत आहेत शेतकरी फरदडचे उत्पन्न?

फरदड कापूस म्हणजे हंगाम संपूनही अधिकच्या उत्पादनासाठी कापसाला पाणी देऊन उत्पादन घेणे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. शिवाय यंदा खरिपातील एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते. शिवाय यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे कापूस मोडणीपेक्षा त्याची जोपासना केली तर आर्थिक लाभ शेतकऱ्यांना होत आहे. पावसाचे पाणी शेतामध्ये साचल्याने रब्बी पेरण्याही रखडेलेल्या होत्या. आता पेरणीची वेळही निघून गेली आहे. त्यामुळे आहे तो कापूस जोपासन्यावरच शेतकऱ्यांचा भर आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात वावराबाहेर काढला जाणारा कापूस अजूनही वावरातच बहरत आहे.

फरदडमुळे काय होते नुकसान?

कापसाचा बहर निघून गेल्यानंतरही तीन-चार महिने कापसाची जोपासना केली. एकतर ऑक्टोंबर महिन्यापासून वातावरणात बदल झाल्याने कापसावर बोंडअळीचा अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. गुलाबी बोंडअळी ही केवळ कापसावर जगत असते. तिचे हे खाद्य जानेवारी महिन्यानंतरही मिळतच राहिले तर तिचे जीवनचक्र तर वाढतेच पण तिच्या पैदासीमधून अनेक अळ्यांची उत्पत्ती होते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकावरही ह्या अळीचा धोका असतो. मात्र, जानेवारीनंतर अळीला कापसाचे खाद्यच मिळाले नाही तर ती सुप्तअवस्थेत जाते. तिचे जीवनचक्र थांबते व त्याचा विपरीत परिणाम इतर पिकांवरही होत नाही.

अशी मिळवा बोंडअळीवर नियंत्रण

यंदा कापसाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना आर्थिक लाभ झाला आहे. पण यामुळे वाढत्या बोंडअळीचे काय हा सवाल कायम राहत आहे. गुलाबी बोंडळीचे नियंत्रण करायचे असेल तर एकट्या शेतकऱ्याने प्रयत्न करुन होणार नाही तर याकरिता जिनींग प्रोसींग मील, कापूस साठवणूक केलेल्या ठिकाणी प्रकाश सापळे किंवा कामगंध सापळे लावावेत. सापळे लावल्याणे बोंडअळी अन्नाच्या उद्देशाने सापळ्यात अडकते. हा प्रयोग केवळ एका शेतकऱ्यांनी करुन नियंत्रण होणार नाही तर गावातील शेतकऱ्यांनी एकाच वेळी ही प्रक्रिया केली तरच बोंडअळीचे प्रमाण कमी होणार आहे.

फरदड न घेतल्यावर शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

हंगाम संपल्यानंतर कापसाच्या क्षेत्रात जनावरे चरण्यासाठी सोडावीत. त्यामुळे ज्या बोंडअळी ही ह्या सुकलेल्या किंवा वाळलेल्या कापसामध्ये लपून राहिलेल्या असतात त्या नष्ट होतात. शिवाय काढणीनंतर शेतीची मशागत करुन बोंडअळीचे कोष तसेच इतर अवस्था ह्या नष्ट होणार आहेत.

संबंधित बातम्या :

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : 2022 वर्ष ठरणार महिला शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी, कोणते विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर?

पिकांवर किडीचा प्रादुर्भाव पण मावा की तांबोरा अगोदर ‘असा’ ओळखा फरक अन् मगच व्यस्थापन करा अन्यथा…

Latur Market | सोयाबीनच्या दराला उतरती कळा, साठवणूक केलेल्या सोयाबीनचे करायचे काय?