लातूर : (Toor Guarantee Centre) तुरीचे हमीभाव केंद्र सुरु होण्यापूर्वी कधी दर हे 6 हजारपेक्षा अधिकचे झाले नव्हते मात्र, आता तुरीच्या बाजारभावात मोठे फरक आढळून येत आहेत. तुरीला हमीभाव केंद्रावर 6 हजार 300 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. असे असताना बाजारभावातील दर वाढल्याने हमीभाव केंद्राकडे (Farmer) शेतकरी आता पाठ फिरवत आहेत. केंद्र सुरु होण्यापूर्वी कधी दर हे 6 हजारापेक्षा जास्त झालेच नाहीत. पण (Traders) व्यापाऱ्यांनी आपली भूमिका बदल्याने हे फरक दिसून येत आहेत. दुसरीकडे (Soybean Rate) सोयाबीनचे दर गेल्या आठ दिवसांपासून स्थिरच आहेत. शिवाय आवक ही वाढत असून शेतकरी आता साठणूकीतला मालाची विक्री करीत आहेत.
खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात असलेल्या तूरीची बाजारपेठेत आवक सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला तुरीचे दर हे 5 हजार 700 ते 5 हजार 900 च्या दरम्यानच होते. मात्र, राज्यात हमीभाव केंद्र ही सुरुच झालेले नव्हते. नाफेडने हमीभाव केंद्रावर तुरीला 6 हजार 300 चा दर ठरवेलेला आहे. मात्र, 1 जानेवारी रोजी राज्यात 186 ठिकाणी हमीभाव केंद्र ही सुरु झाली आहेत. त्यापूर्वी कधीही तूरीचे दर हे वाढलेले नव्हते. या आठ दिवासाच्या कालावधीमध्ये बाजारातील तूरीच्या दराने हमीभाव दराचा टप्पा ओलंडला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी केंद्राकडे पाठ फिरवून व्यापाऱ्यांकडे विक्री करीत आहेत.
डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरात मोठे फेरबदल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडील साठवलेल्या सोयाबीनचे काय होणार हा प्रश्न कायम होता. मात्र, नववर्षात सोयाबीन, कापूस दरामध्ये चांगलीच सुधारणा झालेली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित नाही पण दरात वाढ होऊन सोयाबीन हे 6 हजार 350 रुपयांवर स्थिरावलेले आहे. सोयाबीनचे दर स्थिर झाल्यापासून आवकही वाढली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 ते 20 हजार पोत्यांची आवक सुरु आहे. साठवणूकीतल्या सोयाबीनची विक्री होत असली तरी ती टप्प्याटप्प्याने होत आहे.
सध्या खरिपातील सोयाबीन, तूर आणि कापसाची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला केवळ 4 हजार 400 रुपये दर होता तर कापसाची एन्ट्री ही दमदारच झाली होती. मध्यंतरी केवळ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम झाला होता. यंदा दरात घसरण झाली की, विक्रीपेक्षा साठवणूकीवरच शेतकऱ्यांनी भर दिला होता. त्यामुळे अंतिम टप्प्यात या दोन्हीही पिकांच्या किंमती वाढल्या आहेत. तर आता तूरीची आवक सुरु झाली असून 5 हजार 800 वरील दर आता 6 हजार 600 पर्यंत गेले आहेत. त्यामुळे हंगामाचा शेवट हा गोड होताना दिसत आहे.
खरिपातील सोयाबीनचा असा झाला उपयोग, शेतकऱ्यांना मिळाले नाही उत्पन्न पण मार्गी लागला जनावरांच्या..