हिंगोली : कारभारात तत्परता असली काय होऊ शकते याचे उदाहण सध्या (Hingoli Market Committee) हिंगोली येथील संत नामदेव हळद बाजारात पाहवयास मिळत आहे. हळदीचे वजन झाला की, पैसे शेतकऱ्यांच्या हातामध्ये यामुळे केवळ जिल्ह्यातूनच नाही तर औरंगाबाद, यवतमाळ, बुलडाणा, नांदेड या जिल्ह्यातून हळदीची आवक होत आहे. भल्या पहाटेच वाहनांच्या रांगा ह्या (the arrival of turmeric increased) बाजार समितीच्या आवारात पाहवयास मिळत आहे. वाढत्या आवकमुळे आता वजनकाटे कमी पडत असल्याने त्याचे नियोजन बाजार समितीला करावे लागत आहे. सकाळच्या प्रहरीच 3 हजार 500 क्विंटल हळदीची आवक येथील बाजारपेठेत होत आहे. शिवाय राज्यभरातून आवक आणि परराज्यात मार्केट अशी अवस्था या हळदी बाजाराची झाली आहे.
हळदीचा उपयोग सौंदार्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळेच राज्यस्थान, पंजाब, गुजरात या राज्यातून हिंगोलीच्या हळदीला मागणी आहे. सध्या आवक वाढली असली तरी 7 हजार 500 ते 8 हजार 500 चा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. शिवाय आवक कितीही झाली तरी मात्र, शेतकऱ्यांना त्याच दिवशी रक्कम दिली जाते. त्यामुळे राज्यभरातून आवक होत आहे. दरातील तेजीमुळे भल्या पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा येथील बाजार समितीच्या समोर लागलेल्या असतात.
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यातून हळदीची आवक येथे होते. येथील व्यवहार चोख असल्यामुळे शेतकऱ्यांचा कलही याच बाजारपेठेकडे अधिक आहे. शिवाय येथील हळदीमध्ये कुकुरमीन या घटकाचे प्रमाण अधिक असल्याने सांगली, सातारा या भागातून मोठी मागणी आहे. यामध्ये सौंदर्य प्रसाधने तयार करण्याचे घटक असल्याने कंपन्यामध्ये मोठी मागणी आहे. शिवाय यंदा पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली असल्याने आवकही वाढली आहे.
हळदीसाठी हिंगाली येथील बाजारपेठ एक मुख्य आगार मानले जात आहे. वाढत्या आवकमागे कारणही तसेच आहे. हळदीचा वजनकाटा झाला की, शेतकऱ्यांना रोख पैसे दिले जातात. इतर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना केवळ वायदे दिले जातात. विक्रीनंतरही पैशासाठी खेटे मारावे लागतात. चोख व्यवहारामुळे शेतकऱ्यांचा कल याच बाजार समितीकडे अधिकचा आहे. आता आवक वाढल्याने वजनकाटे देखील कमी पडत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वजन काटे वाढवण्याचे नियोजन असल्याचे बाजार समितीचे सचिव नारायन पाटील यांनी सांगितले आहे.