शेतीमालाच्या निर्यातीची प्रक्रिया नेमके असते तरी कशी? प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

| Updated on: Dec 01, 2021 | 7:33 AM

शेतीमालाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून एक ना अनेक प्रयोग केले जात आहेत. भौगोलिक वातावरण आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनात वाढही होत आहे. वाढीव उत्पानाला योग्य दर मिळावा तसेच परकीय चलन मिळून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा या दृष्टीकोनातून मालाच्या मागणीनुसार इतर देशामध्ये निर्यात केली जाते.

शेतीमालाच्या निर्यातीची प्रक्रिया नेमके असते तरी कशी? प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागेवर परिणाम झााल आहे, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
Follow us on

लातूर : शेतीमालाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून एक ना अनेक प्रयोग केले जात आहेत. भौगोलिक वातावरण आणि तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनात वाढही होत आहे. वाढीव उत्पानाला योग्य दर मिळावा तसेच (foreign exchange) परकीय चलन मिळून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा या दृष्टीकोनातून मालाच्या मागणीनुसार निर्यात केली जाते. यामुळे जागतिक बाजारपेठेत तर याची नोंद होतेच पण आर्थिक लाभही मिळतो. भारतातून मुख्य पिकांसह फळांचीही (Export of agricultural produce) निर्यात होते. मात्र, ही निर्यातीची प्रक्रिया असते तरी कशी याची माहिती आज आपण घेणार आहोत.

सध्या देशातून डाळिंबाच्या निर्यात प्रक्रियेला सुरवात झाली आहे. पण याकिरात कुठे नोंद करावी लागते. आवश्यक कागदपत्रे याची माहिती शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची राहणार आहे. ज्या क्षेत्रातील डाळिंबाची निर्यात करायची आहे त्याची नोंद लागवड केलीच करावी लागते.

 

निर्यातक्षम डाळिंब बागांची नोंदणी करण्याची पध्दत

युरोपियन देशांना डाळिंब निर्यात करु इच्छिणाऱ्या डाळिंब बागायतदारांना त्यांच्या डाळिंब बागेची कृषि विभागाकडे ‘अनारनेट’द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना ताजी फळे व भाजीपाला निर्यात करू इच्छिणाऱ्या उत्पादकांना त्यांच्या बागांची/शेतांची नोंदणी/नुतणीकरण, हॉर्टीनेट ट्रेसेबिलीटी प्रणालीमध्ये नोंदणी करण्याकरीता महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नोंदणी अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागणार आहे. या नोंदणीप्रक्रियेची शेतकऱ्यांना माहिती व्हावी म्हणून स्थानिक वर्तमानपत्र, आकाशवाणी तसेच दूरदर्शनवरून इ.विविध प्रसिध्दी माध्यामांव्दारे प्रसिध्दी देण्यात येते.

कृषी विभागाकडे निर्यात करण्याच्या अर्जासोबत बागेचा स्थळदर्शक नकाशा व गाव नमूना नं. सात बारा या उता-याची प्रत जोडणे आवश्यक आहे. तर एक हेक्टरावरील डाळिंबासाठी नोंदणीसाठी 50 रुपये फी आकारली जाते. या सर्व नोंदणी आणि सर्व प्रक्रिया करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाते.

निर्यातसाठी नोंदणी करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे

विहीत प्रपत्रात अर्ज
7/12 उतारा
बागेचा नकाशा
तपासणी अहवाल प्रपत्र (4अ)
एक हेक्टरावरील क्षेत्राकरिता शेतकऱ्यांना 50 रुपये मोजावे लागतात.

ही प्रक्रिया पार केल्यानंतर मिळते मंजुरी

कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर मंडळ कृषि अधिकाऱ्यांमार्फत बागेची प्रत्यक्ष तपासणी करुन प्रपत्र (4अ) मध्ये तपासणी अहवाल तयार करुन संबंधित शेतकऱ्यांचा प्रस्ताव नोंदणीकरिता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पाठविल्यानंतर ‘अनारनेट’ ऑनलाईन नोंदणी करण्यात येते. संबंधित शेतक-यांना एक वर्षाकरीता युरोपियन देशांना डाळिंब कोड, तालुका कोड, गाव कोड, फार्म व प्लॉट कोड नंबर संगणकाद्वारे देण्यात येतो. त्या नंबरनुसार पुढील सर्व कार्यवाही ऑनलाईनद्वारे करण्यात येते.

संबंधित बातम्या :

ऊसतोडणी झाली की, मापात पाप, हतबल शेतकरी थेट आयुक्तांच्या दालनात

ठरले पण घडलेच नाही..! प्रकल्पातील पाण्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षाच, बदलत्या वातावरणामुळे चिंतेच ‘ढग’

द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी, व्यापाऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा, यंदा तरी निघणार का तोडगा ?