मुंबई : काळाच्या ओघात केवळ शेतामधील मुख्य पिकांवरच उत्पादन वाढेल असे नाही. तर पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा झाला आहे. शेतकरी आता भाजीपाला, फळबाग याची लागवड करुन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. पण दोन्ही हंगामात घेता येणाऱ्या काकडीच्या लागवडीतूनही वर्षभर कमाई करता येते. यासाठी गरज आहे ती वैज्ञानिक पध्दतीने लागवडीची. खरीप आणि रब्बी हंगामात काकडीचे उत्पादन घेतले तर वर्षभर यातून शेतकऱ्यांना पैसे कमवता येणार आहेत.
काकडी हे देशभरात पिकवलेले भारतीय पीक आहे. विशेष: महाराष्ट्रातील कोकन विभागात काकडीचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. अधिकचा पाऊस यासाठी पोषक आहे त्यामुळे कोकण परिसरात काकडीचे लागवड क्षेत्र हे जास्त आहे. महाराष्ट्रात तब्बल 3711 हेक्टरावर काकडीचे उत्पादन घेतले जात आहे. काकडीपासून कोशिंबीर बनवली जाते. त्यामुळे ही भाजी आहारात रोज वापरली जाते.
काकडी हे उष्ण व कोरड्या हवामानात पिकवलेले पीक आहे. मध्यम दर्जा असलेल्या जमिन क्षेत्रावर काकडी ही अधिक जोमात वाढते. या करिता पाण्याचा निचरा होणारे शेत जमिन क्षेत्र गरजेचे आहे. पाणी जमिनीत साठवून राहिले कीड-रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. खरीप आणि उन्हाळ्याच्या हंगामात घेतले जाणारे पिक आहे. जून-जुलैमध्ये आणि जानेवारीमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात खरीप हंगामासाठी काकडीची लागवड ही केली जाते
थंड भागात घेतले जाणारे उत्पादन – थंड काकडीचे उत्पादन हे जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात घेतले जाते. लागवडीनंतर 45 दिवसांनी फळ लागवडीला सुरवात होते. त्याची फळे हिरव्या रंगाची असतात. एका काकडीचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते. हेक्टरी उत्पन्न 30 ते 35 टन असते.
पूना काकडी – ही काकडी हिरव्या आणि फिक्कट पिवळ्या रंगाची असते. उन्हाळ्यात ह्या काकडीची वाढ जोमात होते तर प्रति हेक्टरी 13 ते 15 टन उत्पन्न मिळते.
काकडीची लागवड करण्यापूर्वी शेत जमिन ही उभी व आडवी नांगरणे महत्वाचे आहे, यामधील तण काढून शेतजमिनीची मशागत करुन लागवडीचे क्षेत्र हे सुपिक करुन घ्यावे लागणार आहे. शेतात 30 ते 50 बैलगाड्या कुजलेले खताच्या टाकावे लागणार आहे. उन्हाळी काकडीची लागवड ही 60 ते 75 सेंमी अंतर ठेऊन करावी लागणार आहे. खरीप हंगामात कोकण भागात काकडी लावायचे असेल तर 90 सेंमी अंतरा हे दोन्ही बाजूंचे अंतर असावे तर दोन्ही सरीतील अंतर हे ३ मीटर ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रावर दोन बियाणांच्या मधले अंतर हे योग्य असल्यास उत्पादनात वाढ होणार आहे.
काकडीचे पीक पेरण्यापूर्वी 50 किलो एन, ५० किलो पी. तर पेरणीच्या 1 महिन्यानंतर 50 किलो नायट्रोजनचा दुसरा डोस द्यावा लागणार आहे. पावसाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागणार आहे.
काकडी योग्य पोसल्यावरच त्याची तोडणी सुरु करावी. योग्य पोसलेल्या काकडीलाच बाजारात दर चांगला मिळतो. काकडीची तोडणी ही दर दोन ते तीन दिवसांनी करावी. बदलत्या वातावरणानुसार उत्पादन ठरते. हवामानानुसार काकडीचे उत्पन्न हेक्टरी 200 ते 300 क्विंटल दरम्यान बदलते.
Special Story! सोयाबीन दरवाढीच्या पडद्यामागची गोष्ट, शेतकऱ्यांनी दाखवले एकीचे ‘बळ’
लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना ‘तारणारी’ योजना, शेतीमाल साठवणुकीचीही सोय
PM Kisan : सरकारने नियम बदलले! आता ‘या’ कागदपत्राशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत