नवी दिल्ली: इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफकोनं शेतकऱ्यांसाठी नुकताच नॅनो यूरिया लाँच केला आहे. इफकोच्या 50 व्या वार्षिक बैठकीत याचं लाँचिंग करण्यात आले. नॅनो लिक्विड यूरियाची पहिली खेप उत्तर प्रदेशकडे रवाना करण्यात आली आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना लिक्विड स्वरुपात उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या 500 मिलीमध्ये 40 हजार पीपीएम नायट्रोजन असतो. त्यामुळे यूरीयाच्या 50 किलोच्या बॅग इतकी पोषणतत्वे यामाध्यमातून मिळतील. (Iffco started commercial production of nano urea liquid first batch dispatched to Uttar Pradesh)
इफकोनं त्यांच्या गुजरातमधील कलोल येथील प्लांटमध्ये नॅनो लिक्विड यूरियाची निर्मिती केली आहे. नॅनो बायोटेक्नोलॉजी तंत्रज्ञानावर स्वदेशी पद्धतीनं लिक्वि़ड यूरियाची निर्मिती करण्यात आली आहे. इफकोचे प्रमुख संचालक डॉ. उदय शंकर अवस्थी यांनी 31 मे रोजी याचं लाँचिंग केलं होतं. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पहिली खेप उत्तर प्रदेशकडे पाठवण्यात आली आहे.
नॅनो लिक्विड यूरिया हे 21 व्या शतकातील उत्पादन आहे, असं इफकोचे उपाध्यक्ष दिलीप संघाणी म्हणाले. सध्या आपल्याला पर्यावरण, माती, हवा आणि पाणी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवयाची आहे. आपण या प्रयत्नात यशस्वी झाल्यास पुढील पिढ्यांच्या अन्न सुरक्षेबाबत आपली जबाबदारी पार पाडू, असं संघाणी म्हणाले. गुजरातमधील कलोल, उत्तर प्रदेशातील आंवला आणि फूलपूर येथील इफकोच्या कारखान्यात नॅनो यूरियाचं प्लांट बनवण्याचं काम यापूर्वीच सुरु झालं आहे. पहिल्या टप्प्यात 14 कोटी बॉटल निर्मिती करण्याचं ध्येय आहे.तर, 2023 पर्यंत हे उत्पादन 18 कोटींपर्यंत वाढवण्यात येईल असंही ते म्हणाले.
नॅनो यूरिया हा स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कलोल येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना मंगळवार पासून उपलब्ध होईल. नॅनो यूरियाची 500 मिली बॉटल 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सामान्य यूरियाच्या दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना नॅनो यूरिया उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या अंतर्गत 20 आयसीएआर, देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 43 पिकांवर चाचणी करण्यात आली. यानंतर संपूर्ण भारतातील पिकांवरील परिणामकारकता तपासण्यासाठी 94 पिंकावर चाचणी करण्यात आली. नॅनो यूरियाच्या वापरामुळे पिकांच्या 8 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
Today on #WorldEnvironmentDay , #IFFCO’s commitment for a green planet took another step as we dispatched 1st truck of #IFFCONanoUrea for farmers. A Sustainable Solution for Plant Nutrition with higher Nutrient Use Efficiency. Reduces soil, water & air pollution. #RestoreEarth pic.twitter.com/5AQpNRuwGw
— Dr. U S Awasthi (@drusawasthi) June 5, 2021
संबंधित बातम्या:
इफकोकडून शेतकऱ्यांना खरिप हंगामापूर्वी गिफ्ट, नॅनो युरिया लाँच, पैसेही वाचणार
ऑक्सिजनची समस्या लवकरच होणार दूर, IFFCO 30 मेपासून सुरू करणार तिसरा प्रकल्प
(Iffco started commercial production of nano urea liquid first batch dispatched to Uttar Pradesh)