Weather Report : राज्यात मान्सून कधी परतणार, हवामान विभागाचा नवा अंदाज, जून महिन्यात कुठं किती पाऊस झाला? वाचा सविस्तर

| Updated on: Jun 30, 2021 | 6:12 PM

गेल्या काही दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासह होणा-या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला.पण येत्या आ़ठवड्यात परत पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

Weather Report : राज्यात मान्सून कधी परतणार, हवामान विभागाचा नवा अंदाज, जून महिन्यात कुठं किती पाऊस झाला? वाचा सविस्तर
महाराष्ट्र मान्सून अपडेट
Follow us on

मुंबई: राज्यात मान्सूनने गेल्या काही दिवसात ओढ दिलेली दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ढगांच्या गडगडाटासह होणा-या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. पण, येत्या आ़ठवड्यात परत पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागानं वर्तवलीआहे. राज्यात 8 ते 9 जुलै नंतर परत पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (IMD Predicts Monsoon rain come back after 8 and 9 July in Maharashtra issue June Month Weather Report)

30 जून पर्यंतचे राज्यातले पावसाचे चित्र

राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना, परभणीमध्ये सर्वाथिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर सर्वात कमी पाऊस अकोला, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये झाला आहे. तर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली,पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर मध्ये नियमित सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. तर, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, गडचिरोली, गोंदियामध्ये देखील समाधानकारक पाऊस झाला आहे.

चंद्रपूरमध्ये 20 दिवसानंतर मुसळधार पाऊस

चंद्रपूरात तब्बल 20 दिवसांनी बरसला मुसळधार पाऊस, पाऊस खंडित झाल्याने बळीराजाला लागली होती चिंता, गेल्या अर्धा तासापासून शहरात पावसाच्या जोरदार सरी, प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना थोडा दिलासा, 7 जून पासून जिल्ह्यांत वार्षिक सरासरीच्या केवळ 20 टक्के पावसाची नोंद, आकाश ढगाळलेले असल्याने आगामी काळात आणखी पावसाची शक्यता आहे.

चंद्रपूरात तब्बल 20 दिवसांनी मुसळधार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. धान पट्ट्यातील पाऊस खंडित झाल्याने बळीराजाला मोठी चिंता लागली होती. गेल्या अर्धा तासापासून शहरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. प्रचंड उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. 7 जून पासून जिल्ह्यांत वार्षिक सरासरीच्या केवळ 20 टक्के पावसाची नोंद झाली आहे. कापूस- सोयाबीन-धान प-हे या पावसाने जिवंत राहणार आहेत. सध्या आकाश ढगाळलेले असल्याने आगामी काळात आणखी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या:

कृष्णा साखर कारखान्यावर कुणाची सत्ता? शेतकऱ्यांचा कौल कुणाला? प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण

चाळीसगावमधील भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, आई, वडील आणि बहिण गमावलेला चिमुरडा गंभीर जखमी

(IMD Predicts Monsoon rain come back after 8 and 9 July in Maharashtra issue June Month Weather Report)