पुणे: पृथ्वी मंत्रालय (Ministry of Earth) अंतर्गत भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निमगिरी याठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रAutomatic weather station) उभारण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अनुपम कश्यपी (Scientist F) हवामान विभाग प्रमुख पुणे यांचे हस्ते झाले. यावेळी हवामान विभागाचे कर्मचारी , संजय साबळे ( भारतीय हवामानशास्र विभाग पुणे) इंदूरकर, प्रताप रसाळ, अविनाश कुंडले , रामदास भांबुरे व डी.व्ही.केंद्रे उपस्थित होते.
निमगिरी गावचे सुपुत्र संजय सिताराम साबळे ( भारतीय हवामानशास्र विभाग पुणे) व विजय सिताराम साबळे (सर) या बंधूनी स्वखुशीने स्वतःची जागा या उपकणासाठी दिली आहे.
निमगिरीतील स्वयंचलित हवामान केंद्रामुळे सह्याद्रीतील पर्वत रांगातील जवळपास सर्व गावांना तसेच स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज मिळणार आहे.मोबाईल अँपद्वारे तापमान ,पर्जन्यमान ,आद्रता , वाऱ्याची दिशा ही देखील माहिती एका क्लीकद्वारे IMD च्या AWSARG च्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शिवनेरी किल्ला मागे, काळ्या कुट्ट मेघांना गवसणी घालताना…व तेच्या समोर, त्याच्या साक्षीने, स्वयंचलीत हवामान केंद्र, आज IMD ने कार्यान्वित केले. हवामानाचा वेध घेण्यासाठी…
– निमगीरी, जुन्नर, पुणे pic.twitter.com/fOAOQ9FrzQ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 2, 2021
कार्यक्रमासाठी निमगिरीच्या सरपंच श्रीमती सुमनताई साबळे , पंचायत समिती सदस्य काळूराम गागरे , युवा कार्यकर्ते जालिंदर साबळे , श्री डी.व्ही.केंद्रे , संतोष साबळे , एस.के.दिघे ग्रामसेवक व मोठया संख्येने निमगिरी ग्रामस्थ उपस्थित होते.
भारतीय हवामान विभागाकडून यंदा प्रथमच पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात हवामानाचा अंदाज जारी करण्यात येत आहे. हवामान विभागाचे मुख्य अधिकारी डॉ.महापात्रा यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला. पावसाळ्याच्या या कालावधीमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरी इतका राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सन 2021 च्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सरासरी इतका कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात या काळात सरासरीच्या 95 ते 105 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महन्यात देशात सर्वत्र पाऊस पडेल असाही अंदाज आयएमडीच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.
इतर बातम्या
ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश