नाशिक : निफाड (nashik nifad) तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले असून या पावसामुळे द्राक्षे, कांदे, कलिंगड (Watermelon) या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. आता वांगे या पिकाला देखील या पावसाचा फटका जाणवू लागला आहे. शेतकऱ्यांनी कांदा पीक सोडून दुसरे पीक घ्यावे असे ठरवले होते. पंरतु त्यांनी वांग्याची लागवड केली, मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अक्षरशः वांग्याचं पीक खराब झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुध्दा निघणं अधिक मुश्कील झालं आहे.
गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे आतापर्यंत मिळालेला दिलासादायक काळ संपुष्टात आला असून, वातावरण स्वच्छ होताच सूर्याचा रुद्रावतार बघावयास मिळत आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून, रविवारी 41 अंशांवर असलेला पारा सोमवारी मात्र थेट 41.8 अंशावर गेला आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्याने आता जिल्हावासी होरपळून निघत आहेत. हवामान खात्याचा आतापर्यंतचा अंदाज बरोबर निघाला आहे. मार्च, तसेच एप्रिल महिन्यातील 10 दिवस कधी ढगाळ वातावरण व कधी पावसामुळे थंडगार गेले. मात्र, आता वातावरण स्वच्छ झाले असून, हवामान खात्याचा अंदाज असूनही पाऊस पडलेला नाही. उलट स्वच्छ वातावरणामुळे तापमान वाढत चालले असून, उन्हामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होऊ लागले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याचा पारा 41 अंशांवर गेला आहे. तर, सोमवारी पारा थेट 41.8 अंशावर गेला होता. आता खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू झाल्याचे जाणवत आहे.
बदलत्या हवामानाचा फटका लोकांच्या आरोग्याला बसला आहे. त्याचबरोबर शेतीला सुध्दा बसत आहे.