मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या अत्यावश्यकमध्ये येत असल्या तरी वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेता या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन होणे गरजेचे आहे. कारण (Navi Mumbai,) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही अशियामधील सर्वात मोठी बाजारपेठ असून याठिकाणी लाखोंच्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे हे ठिकाण सुध्दा हॉटस्पाॉट होऊ शकते. त्यामुळे आता वाढती रुग्णसंख्या पाहता केवळ पूर्वसूचना न देता थेट कारवाईची भूमिका घेणे महत्वाचे असल्याचे नवी मुंबईचे आयुक्त यांनी अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. (Agricultural Produce Market Committee) कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाढती गर्दी पाहता त्यांनी बाजार समितीचे सचिव प्रकाश अष्टेकर आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या सूचना केल्या आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही अशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठे आहे. या ठिकाणी राज्यभरातून व्यापारी दाखल होतात तसेच शेतकऱ्यांचीही सातत्याने वर्दळ असते. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय याच बाजारपेठेच्या परिसरात दररोज 2 हजारहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्याअनुशंगाने महापालिका तर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहेच. पण आता प्रत्यक्ष कारवाईची वेळ आली आहे. कोणतिही पूर्वसूचना न देता थेट दंडात्मक कारवाई केल्याशिवाय नियमांचे पालन होणार नाही. कोरोनाबाबतचे नियमांची अंमलबजावणी व्हावी म्हणून आता नवी मुंबई महापालिकेने कडक अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे.
बाजार समितीमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येकाची टेस्टिंग केली जाणार आहे. टेस्टिंगच्या ठिकाणी गर्दी होत असल्यास ते मनपाने नमलेल्या पथकांच्या निदर्शनास आणून द्यावे लागणार आहे. बाजार समितीमधील अधिकारी-कर्मचारी यांना दोन्ही डोस अनिवार्य करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे.
वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता बाजार समित्यांमध्ये नवीन नियमावली जारी करण्यात आली होती. त्यानुसार बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना दोन डोस हे बंधनकारक करण्यात आले होते तर परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांना डोसची व्यवस्थाही करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असले तरी कल्याण – डोंबवली मनपा हद्दीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी किरकोळ बाजार बंद करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
Sugar Factory: तेरणा सांगा कुणाचा? भैरवनाथ की ट्वेंटी वन, फैसला 31 जानेवारीला..! वाचा सविस्तर
दुष्काळात तेरावा : निसर्गाचा लहरीपणा अन् बोगस बियाणे, उत्पादनावरील खर्चानेच शेतकरी मेटाकूटीला