लातूर : उत्पादन वाढीसाठी आवश्यक असते ते मातीचे आरोग्य. मात्र, या महत्वाच्या बाबीकडेच शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. काळाच्या ओघात शेतीव्यवसयात अमूलाग्र बदल झाले पण आजही या मूलभुत गोष्टीकडे दुर्लक्षच होत आहे. शेतातील मातीच्या नमुन्यांचे भौतिक, रासायनिक जैविक पृथक्करण करून त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपसाणे हे महत्वाचे असते. यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यावे त्याचा किती उतार पडेल या सर्व बाबींचा अंदाज यामधून बांधता येतो. त्यामुळेच माती परिक्षण कसे केले जाते याची माहिती आपण आज घेणार आहोत. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते.
शेतातील मातीचा नमुना योग्य पद्धतीने घेणे ही माती परीक्षण कार्यक्रमात सर्वात महत्वाची बाब आहे. मातीच्या नमुन्याचे पृथक्करण अत्याधुनिक उपकरणाद्वारे केले जाते. मातीचा नमुना जर त्या शेताचा प्रतिनिधीक नमुने कधीही काढता येतात. मात्र, पाऊस पडल्यानंतर, पाणी दिल्यानंतर आणि वाफसा नसताना आणि खते घातल्यानंतर लगेच नमुने काढु नयेत. जमिनीत पीक घेण्याच्या हंगामापुर्वी नमुने घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी कोणते अन्नद्रव्य ही शेतजमिनीत आहेत हे समजणार आहे.
1) सर्वसाधारणपणे मातीचा नमुना शेत नांगरण्यापूर्वी घ्यावा.
2) शेतात जनावरे बसण्याची जागा, खत, कचता टाकण्याच्या जागा, विहिरीचे आणि शेताचे बांध या जागेतुन मातीचे नमुने घेऊ नयेत.
3) शेतात रासायनिक खते टाकली असल्यास 2 ते 2 महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये.
4 ) निरनिराळया प्रकारच्या जमिनीचे किंवा निरनिराळया शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळु नयेत.
5) झाडाखालील, पाणथळ जागेतील व माती वाहुन गेलेल्या जागेतील मातीचा नमुना घेऊ नये.
6 ) ठिंबक सिचन असल्यास वेटिंग बॉलच्या कडेचा नमुना घ्यावा.
मातीचा नमुना स्वच्छ कापडी पिशवीत भरून खालील माहिती भरून प्रयोगशाळेकडे पृथक्करणासाठी पाठवावा. याबरोबर शेतकऱ्यांचे नाव व पत्ता, नमुना घेतल्याची तारीख व नमुना घेतलेल्या जमिनीची खोली, गट नंबर व एकुण क्षेत्र, जमिनीचा प्रकार व खोली, मागील हंगामात घेतलेले पीक व पुढील हंगामात घेण्याचे पीक व जात याची माहितीही देणे आवश्यक राहणार आहे.