पुर्वहंगामी द्राक्ष बाजारात, सोयाबीनप्रमाणेच मिळतोय मुहुर्ताचा दर

| Updated on: Oct 06, 2021 | 12:54 PM

पुर्वहंगामातील द्राक्ष हे बाजारात दाखल झाले आहेत. जून महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचा माल आता बाजारात दाखल होत आहे. ही द्राक्ष मुहुर्ताची असून नाशिक जिल्ह्यातील साटणा तालुक्यातील चैत्राम पवार यांच्या द्राक्षाला 130 रुपये किलोचा दर मिळालेला आहे.

पुर्वहंगामी द्राक्ष बाजारात, सोयाबीनप्रमाणेच मिळतोय मुहुर्ताचा दर
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नाशिक : वातावरणातील बदलामुळे गेल्या तीन वर्षापासून नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार हे संकटाचा सामना करीत आहेत. यंदाही फळबागांवर रोगराई तसेच पावसाचाही परिणाम झालेला आहे. अशा परस्थितीमध्ये आता पुर्वहंगामातील द्राक्ष हे बाजारात दाखल झाले आहेत. जून महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचा माल आता बाजारात दाखल होत आहे. ही द्राक्ष मुहुर्ताची असून नाशिक जिल्ह्यातील साटणा तालुक्यातील चैत्राम पवार यांच्या द्राक्षाला 130 रुपये किलोचा दर मिळालेला आहे. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीन बाजारात दाखल झाले होते तेव्हा सोयाबीनलाही असाच विक्रमी दर मिळालेला होता. मात्र, दर कायम न राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता द्राक्षांच्या बाबतीतमध्येही असे होऊ नये ही अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

द्राक्ष बागांमधून अधिकचे उत्पन्न मिळत असले तरी तेवढ्याच प्रमाणात बागायतदारांना धोकाही पत्कारावा लागतो. रोगराईपासून बचाव करण्यासाठी फवारणी आणि यामध्येच यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा देखील सामना करवा लागलेला आहे. असे असले तरी नाशिक जिल्ह्यात पिक काढणीची लगबग ही सुरु झालेली आहे. तर मुहुर्ताच्या द्राक्षाला तब्बल 130 रुपये किलोचा दर मिळालेला आहे.

पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनाच्या अंगाने जूनच्या अखेरीस छाटण्या सुरू होत असतात; मात्र चालू वर्षी शेतकऱ्यांनी पंधरा दिवस उशिराने छाटण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये द्राक्ष बागांमध्ये डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक संरक्षण खर्च वाढला. तर आता माल काढणी योग्य झाल्यानंतर गेल्या सप्ताहात झालेल्या सततच्या पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे काढणीस आलेल्या एकूण उत्पादनापैकी 20 ते 25 टक्के मालाचे नुकसान झाल्याची सध्या स्थिती आहे.

15 दिवस उशिराने छाटण्या

द्राक्ष उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असला तरी या बागा जोपतण्यासाठी जोखीमही आहे. लागवडीपासूनच रोगराईचा प्रादुर्भाव असल्याने मराठवाड्यातील शेतकरी द्राक्ष बाग लादण्यास धजत नाहीत. मात्र, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डाऊनीसारख्या किडीपासून बचाव करीत द्राक्ष जोपासले होते. शिवाय नुकसानीचा अंदाजा घेऊन आता जून-जुलै पासून छाटणीला सुरवात झाली आहे. पावसाचे संकट असल्याने यंदा 15 दिवस उशिराने द्राक्ष छाटण्यास सुरवात झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

नवरात्र उत्सवामुळे मागणी वाढली

नवरात्र महोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे द्राक्षे मागणी वाढत आहे. विशेष:ता उत्तरप्रदेशमध्ये मागणी होत असल्याने चांगला दरही मिळत आहे. बागा फुलोऱ्यात असतानाच किडीचा प्रादुर्भाव आणि ऐन काढणीच्या प्रसंगी पावसाचा मारा यामुळे यंदाही बागा हातच्या जाणार अशीच काहीशी स्थिती होती मात्र, पावसाने आता उघडीप दिल्याने जून महिन्यात छाटणी झालेल्या बागांचा माल आता बाजारात दाखल होत आहे. उत्तरप्रदेश येथील कानपूरला मालाची मागणी असल्याने हंगामाच्या सुरवातीला तर दर चांगला मिळत आहे.

15 दिवसांनी आवक वाढणार

सध्या बाजारात दाखल होत असलेली द्राक्ष ही पुर्वहंगामातील आहेत. याची छाटणी ही जून-जुलै मध्ये झाली असून नव्याने दाखल झालेल्या द्राक्षला चांगला दरही मिळत आहे. पण हा दर निश्चित नसूम अजून 15 दिवसांनी आवक वाढल्यावर काय दर मिळतो हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. (In the grape market, the rate of newly introduced grapes is also good)

संबंधित बातम्या :

हिवाळ्यात होईल दुध उत्पादनात घट, अशी घ्या जनावरांची काळजी

साखर आयुक्तालयांच्या नियमांचे पालन करा, अन्यथा कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल

दावे झाले…पंचनामे झाले…नुकसानभरपाई मिळण्याची नेमकी प्रक्रिया काय ?