नांदेड : कापूस हंगाम हा अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी (Cotton Stock) साठवलेला कापूस संपत असताना दुसरीकडे दरात वाढ होत होती. यंदाच्या हंगामात (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी उत्पादनात झालेली घट आणि शेतकऱ्यांनी विक्री केल्यानंतर वाढलेला दर या दोन्ही बाबीतून शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. फरदडमुळे शेतीक्षेत्राचे नुकसान होते शिवाय (Outbreak of bondage) बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होतो म्हणून शेतकऱ्यांनी फरदडमधून उत्पादन घेणे टाळले होते. पण सध्याचे वाढत असलेले दर पाहता पुन्हा पळाट्यांना पाणी देण्याचा प्रकार सुरु झाला आहे. शिवाय आता फरदडसाठी खर्च नसल्याने शेतकरी आहे त्या पाण्यावर फरदड जोपासण्यात दंग आहे. जिल्ह्यात कापासाला 10 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपली भूमिका बदललेली आहे.
यंदा कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी त्याचा थेट शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. शेतकऱ्यांकडे साठवणूकीतला कापूस होता तेव्हा कमी दराने विक्री करावी लागली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना कापसाने 10 हजार प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. पण याचा अधिकचा फायदा हा व्यापाऱ्यांना होत आहे. अशा प्रतिकूल परस्थितीमध्येही ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक केली आहे त्यांची चांदी आहे पण असे शेतकरी बोटावर मोजण्याइतपतच आहेत.
खरिपात झालेल्या पावसामुळे कापसाचे नुकसान होऊन उत्पादनात घट झाली होती. घटत्या उत्पादनामुळे यंदा विक्रमी दर मिळाला आहे. सध्याच्या वाढत्या दरामुळे पळट्यास पुन्हा पाणी देऊन फरदडचे पीक घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. फरदडमुळे इतर पिकांना धोका असला तरी वाढीव दरामुळे शेतकरी नुकसान पत्करुन फरदडे पीक घेत आहेत.विहीर, बोरमध्ये मुबलक पाणी असून त्याचाच उपयोग आता हे पीक घेण्यासाठी होत आहे.
कापसाचा बहर निघून गेल्यानंतरही तीन-चार महिने कापसाची जोपासना केली. एकतर ऑक्टोंबर महिन्यापासून वातावरणात बदल झाल्याने कापसावर बोंडअळीचा अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. गुलाबी बोंडअळी ही केवळ कापसावर जगत असते. तिचे हे खाद्य जानेवारी महिन्यानंतरही मिळतच राहिले तर तिचे जीवनचक्र तर वाढतेच पण तिच्या पैदासीमधून अनेक अळ्यांची उत्पत्ती होते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकावरही ह्या अळीचा धोका असतो. मात्र, जानेवारीनंतर अळीला कापसाचे खाद्यच मिळाले नाही तर ती सुप्तअवस्थेत जाते. तिचे जीवनचक्र थांबते
बडेजाव सर्जाचा, आख्खं गाव आलंय सेलिब्रेशनला, अल्पभूधारक शेतकऱ्याचं मोठं मन
Organic Farm : हिमाचल प्रदेशचा नैसर्गिक शेतीचा आराखडा तयार, जिथे सुरवात झाला त्या महाराष्ट्रात काय?