यवतमाळ : खरीप हंगामावर (Kharif Season) सुरु झालेले संकट अद्यापही कायम आहे. मध्यंतरी पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा उत्पादनावर आणि दरावरही परिणाम जाणवत आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे तुरीवर शेंगअळी व फुल गळतीचा धोका निर्माण झाला होता. ही सर्व (Natural Calamities) नैसर्गिक संकटे होते आता निर्माण झालेले संकट हे निराळे आहे. (Cotton) कापूस हे खरिपातील एकमेव असे पीक आहे ज्याचे दर दिवसागणिस वाढत आहेत. असे असताना कापूस तोडणीसाठी मजूरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांअभावी वेचणी रखडली आहे. शिवाय वेळेत तोडणी न झाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर आणि दरावरही होत आहे. त्यामुळे पिकले असून पदरात पडेना अशी अवस्था निर्माण झाली आहे.
कापसाचे उत्पादन कमी आणि मागणी अधिक असल्याने दर हे वाढत आहेत. शिवाय आता कापूस केंद्रही जागोजागी झाल्याने विक्रीची सोय झाली आहे. सर्वकाही पोषक असताना मात्र, तोडणीसाठी मजुरच मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. आता शेतकऱ्यांनाच मुक्कामी राहून कापसाची तोडणी करावी लागत आहे.
तीन महिन्यापूर्वी कापसाचे दर हे 6500 वर होते. एकीकडे सोयाबीनच्या दरात दिवसागणिस घट होत आहे तर दुसरीकडे त्याचप्रमाणात कापसाचे दर हे वाढत आहेत. यंदा मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र घटले तर सोयाबीनचे वाढले होते. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले तर यवतमाळ आणि खानदेशात उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. परराज्यातील व्यापारी हे कापूस खरेदीसाठी दाखल होत आहेत. तीन महिन्यात 3 हजाराने कापसाचे दर वाढले आहेत. शिवाय भविष्यातही दर वाढतीलच असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे तोडणीबरोबरच शेतकऱ्यांचा साठवणुकीवरही भर आहे.
पोषक वातावरणामुळे कापसाचे उत्पादन वाढलेले आहे. पण मजूरांअभावी कापसाची तोडणी रखडलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आपली दिवाळी ही शेतातच करावी लागली आहे. ऐन दिवाळीतही तोडणीची कामे सुरु होती. दिवाळीनंतर आता कापूस विक्रीला वेग आला आहे. दरही 8500 ते 9000 हजार प्रति क्विंटल असल्याने गरजवंत शेतकरी हे विक्री करीत आहेत. पण कापूस वेचणीला 10 रुपये किलोचा दर असूनही मजूर मिळतच नाहीत. त्यामुळे तोडणीविना कापूस शेतातच आहे. अधिकचा काळ कापूस तोडणीविना राहिला तर त्याचा परिणाम दरावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच अख्खं कुटूंब आता कापूस वेचणीत गुंतलेले आहे. तर गावात मजूर मिळत नसल्याने परगावातील मजूरांना अधिकची मजूरी आणि वाहनाचा खर्च करुन आणावे लागत आहे.
केवळ योग्य प्रकारे कापसाची वेचनी न केल्याने उत्पादनात घट होते. वेचणीच्या दरम्यान, इतर काडी, पालापोचोळा येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण त्यावरुनच कापसाची प्रत ठरणार आहे. त्यामुळे वर्षभर केलेल्या मेहनतीचे चीज करायचे असेल तर वेचणीही तेवढीच महत्वाची आहे. कापसाच्या वेचणीनंतर तो कोरड्या खोलीत साठवून ठेवावा. उघड्या अंगणात साठविलेल्या असल्यास त्वरित झाकून ठेवावा. डागाळलेला रंग बदललेल्या किडलेल्या बोंडापासून चांगला कापूस वेगळा साठवावा.
‘झामा’ ची सेंद्रिय शेती, शेतकऱ्यांना फायदा अन् ग्राहकांना दर्जेदार अन्न पुरवठा
ही माहिती गरजेची..! जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे ?
नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा , कांद्यासह भातशेतीचे वांदे, दोन दिवस धोक्याचेच