मुंबई : तेल उद्योगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मूल्याच्या बाबतीत खाद्य तेलांची आयात 63 टक्क्यांनी वाढून 1.17 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. खाद्य तेल आणि अखाद्य तेलाचा समावेश असलेल्या वनस्पती तेलाचे 2020- 21 मध्ये जवळपास 131.3 लाख टनावर स्थिर झाला होता. मात्र तेल उद्योगाच्या आकड्यांच्या आधारे खाद्यतेलांची आयात 63 टक्क्यांनी वाढून 1.17 लाख करोड रुपये इतकी झाली आहे.
वनस्पती तेल, खाद्य तेल आणि अखाद्य तेलाचा यात समावेश आहे. सॉल्वेट एक्सट्रैक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 2020-21 वर्षात वनस्पती तेलांची आयात 135.31 लाख टन नोंदवण्यात आली आहे. तर 2019-20 वर्षात हीच संख्या 135.25 लाख टन इतकी होती. वनस्पती तेलांची आयात मागील सहा वर्षात दुसऱ्यांदा कमी झाल्याचे यात म्हटले गेले आहे. खाद्य तेलांची आयात ३,४९,१७२ टनावरुन वाढून ३९९,८२२ टन झाली आहे.
इंडोनेशिया आणि मलेशिया हे आरबीडी पामोलिन आणि क्रूड पाम तेलाचे प्रमुख पुरवठादार आहेत. कच्च्या सोयाबीन तेलाची आयात प्रामुख्याने अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून केली जाते तर कच्च्या सूर्यफुलाचे तेल प्रामुख्याने युक्रेन, रशिया आणि अर्जेंटिना येथून आयात केले जाते. 1 नोव्हेंबर रोजी विविध बंदरांवर खाद्य तेलाचा साठा अंदाजे 5,65,000 टन आणि पाइपलाइन स्टॉक 11,40,000 टन आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत हा साठा 20.05 दशलक्ष टनांनी कमी झाला आहे. एसईएने म्हटले आहे की, किंमतीच्या बाबतीत, खाद्य तेलाची आयात 2019-20 मधील 71,625 कोटी रुपयांवरून 2021-21 मध्ये 1,17,000 कोटी रुपये होती. गेल्या काही महिन्यांत भारत सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात सातत्याने बदल केला आहे. 2019-20 या काळात 4.21 लाख टनांच्या तुलनेत चालू वर्षात रिफाइंड तेलाची आयात वाढून 6.86 लाख टन झाली, तर कच्च्या तेलाची आयात 127.54 लाख टनांच्या तुलनेत थोडी घट झाली आहे.
तेलबियांमध्ये स्वावलंबी होण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनीही शेतकऱ्यांना बियाण्यांच्या वाणांची उपलब्धता वाढवून तेलबियांची उत्पादकता वाढविण्यावर भर दिला आहे. यासंदर्भात एप्रिल मध्ये झालेल्या वेबिनारमध्ये राज्य सरकारांशी आणि 30 एप्रिल रोजी झालेल्या खरीप परिषदेत सविस्तर चर्चा केली आहे. या चर्चेद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन अंतर्गत उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाणे वाणांच्या मुक्त वितरणावर भर देऊन सोयबीन आणि भुईमूग या दोन्ही क्षेत्र आणि उत्पादकता दोन्ही वाढविण्याची रणनीती असल्याचे कृषीमंत्री यांनी स्पष्ट केले होते. उर्वरित तेलांचे दर स्वस्त असल्याने मोहरीची मागणी कमी झाली आहे. पण स्थानिक बाजारात मोहरीला मागणी आहे. दिवाळी मुहूर्त व्यवसायाच्या दिवशी मोहरी खरेदीची किंमत प्रति क्विंटल 9321 एवढी होती.
काय म्हणता..! भंडाऱ्यातील शेतकऱ्यांकडे महावितरणची 225 कोटी रुपयांची थकबाकी, सवलतीचा लाभ घ्या अन्…
पुणे बाजार समितीमध्ये आता एकरकमी पार्कींग शुल्क, बंदचा निर्णय मागे
कृषीपंपधारकांना महावितरणकडून नवसंजिवनी, 12 लाख शेतकऱ्यांना विजबिलात सवलत