सिंधुदुर्ग : (cold swells the nutritious environment) वाढत्या थंडीचा फायदा हा (Orchards) फळबागांचा मोहर वाढण्यासाठी होणार असल्याचा अंदाज कृषी तंज्ञांनी वर्तवलेला होता. अखेर तो खरा होताना दिसत आहे. कारण कोकणात आंब्याचा दुसऱ्या टप्प्यातील मोहर चांगला लागला असून या वातावरणाचा काजू पिकालाही चांगलाच फायदा होत आहे. त्यामुळे (fruit bearing) फळधारणा होणार असून उत्पादनातही मोठा फरक पडणार आहे. मध्यंतरी अवकाळी, अतिवृष्टीनंतर फळबागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. आता केवळ थंडीवरच सर्वकाही अवलंबून होते. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून पडलेल्या थंडीचा परिणाम केवळ फळबागांवरच झाला असे नाही तर रब्बी हंगामातील पिकांनाही झालेला आहे.
अधिकच्या उत्पादनासाठी फळबागांचे व्यवस्थापन हे दरवर्षी चांगलेच केले जाते. यंदा मात्र, निसर्गाचा लहरीपणाचा फटका बागायतदारांच्या व्यवस्थापनाला अडसर ठरला. अन्यथा यंदा पोषक वातावरणामुळे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज शेकतरी वर्तवत होते. मात्र, ऑक्टोंबर महिन्यात परतीच्या पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले होते. त्यानंतरही काजू बागा बहरु लागल्या होत्या पण पुन्हा डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सलग 20 दिवस पावसामध्ये सातत्य राहिल्याने फळधारणा सोडूनच द्या पण मोहर तरी लागतो की नाही अशी आवस्था झाली होती. हे कमी म्हणून की काय ढगाळ वातावरणामुळे फळबागांवर रोगराई अन् किडीचा प्रादुर्भाव वाढलेला होता. त्यामुळे उत्पादनाची आशा बागायत शेतकऱ्यांनी सोडून दिली होती.
पहिल्या टप्प्यात फळबागांचे नुकसानच झाले आहे. पण आता दुसऱ्या टप्प्यातील वातावरण फळधारणेसाठी पोषक आहे. यापूर्वी आंबा बागांना मोहर लागला होता. आता थंडीचा फायदा हा काजू पिकाला होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर काजूचे उत्पादन घेतले जाते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने शेतकरी पीकपध्दत बदल्याण्याच्या विचारात आहे. यंदा सर्वकाही नुकसानीचे होत असताना वाढत्या थंडीमुळे दिलासा मिळालेला आहे.
फळांमध्ये केळी बागा सोडता थंडी ही सर्वच पिकांसाठी पोषक मानली जात आहे. आंबा, काजूच्या तर फळधारणेसाठी पोषक थंडी ठरत आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांच्या वाढीसाठी देखील हे वातावरण पोषक ठरत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. हरभऱ्यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, औषध फवारणीनंतर पुन्हा ही पिके बहरत आहेत. यातच राज्यात थंडीचा लाट असल्याने त्याचा फायदा पिकांची वाढ होण्यासाठी होत आहे.