नवी दिल्ली: भारत येत्या आर्थिक वर्षात स्तरावर तांदूळ बाजारात दबदबा कायम राखण्याची शक्यता आहे. व्यापार आणि उद्योग तज्ज्ञांच्या मते, गैर-बासमती तांदळाची निर्यात गेल्या आर्थिक वर्षात 13.08 दशलक्ष टन (एमटी) विक्रमी मालवाहतुकीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार असलेल्या भारताने परदेशात 6.6 दशलक्ष टन बासमती तांदूळ पाठवला आहे. भारतानं तांदळाची एकूण निर्यात 65,297 कोटी रुपयांवर गेली आहे. 2019-20 मध्ये 45,426 कोटी रुपये तांदळाची निर्यात केली होती.
कोरोना साथीच्या रोगामुळे भारताच्या निर्यातीवर प्रभाव होण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे (AIREA) कार्यकारी संचालक विनोद कौल यांनी बिझनेस लाइनला सांगितले की, “आम्ही गैर-बासमती तांदळाची चांगली निर्यात करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण 14-15 दशलक्ष अधिक टनांची निर्यात होऊ शकेल.
सरकारच्या अंदाजानुसार गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. काही देशांकडे तांदळाचा मुबलक साठा होता. नवी दिल्लीतील विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार आयातदार तांदळाच्या किमती कमी झाल्यानंतर ते खरेदी करु शकतात. तांदळांच्या किमती गेल्या काही दिवसांमध्ये उतरल्या आहेत. सध्या जागतिक पातळीवर तांदळाच्या किमती 16 महिन्यांच्या तुलनेत कमी पातळीवर आहेत.
बासमती तांदळाची निर्यात एप्रिल महिन्यात 15 टक्के कमी होती. मे महिन्यातही निर्यात कमी राहिली होती. मुंबईतील व्यापाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आफ्रिका आणि बांग्लादेशमध्ये चांगली निर्यात सुरु असल्याचं सांगितलं आहे. यावर्षी बांग्लादेशात एक दशलक्ष गैर-बासमती तांदळाची निर्यात केली आहे. भारतीय गैर बासमती तांदळाचा सर्वात मोठा आयातदार बांग्लादेश आहे.
बी.वी कृष्ण राव, अध्यक्ष द राईस एक्सपोर्टर्स असोसिएशन यांनी तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशमध्ये नवं पीक आल्यानं भारताच्या निर्यातीला चालना मिळाली असल्याचं सांगितलं.
इतर बातम्या:
नंदुरबारकडं पावसाची पाठ, बँकांनीही पीक कर्जासाठी हात आखडला, पेरण्या खोळंबल्या
India rice exports likely to top last year performance in rice export know the All Details