बुलढाणा : खरिप हंगामावर पेरणीपासूनच निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने उशिराने पेरा झाला तर आता पिके ऐन बहरात असताना ढगाळ वातादरणामुळे खरिपातील कापसावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात निर्माण झाले आहे.
खरिप हंगातील पिकावर शेतकऱ्यांचे अर्थकारण हे अवलंबून असते. यंदा मात्र, निसर्गाची अवकृपा राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील जळगांव जामोद, संग्रामपूर तालुक्यात तर कपाशीवर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातादरण आणि सततचा रिमझीम पाऊस यामुळे कपाशी पीक हे करपून जात आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे पण पिकासाठी झालेला खर्चही काढावा कसा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. जिल्ह्यात खरिपात कापूस आणि सोयाबीन ही दोन मुख्य पिके आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जळगांव जामोद, संग्रामपूर तालुक्यात सुर्यदर्शन हे झालेले नाही. त्यामुळे उभ्या मूग, उडीदाला अंकूर फुटले तर शेंगाना बूरशी आली असून दाणेही खराब झाले आहेत. जिल्ह्यात हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाचे प्रमाण हे कमी आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचा वाढच झाली नाही. त्यामुळे सोयाबीनला शेंगा लागलेल्या नाहीत तर कपाशीचा खराटा झाला आहे.
गतवर्षीही खरिपात शेतकऱ्यांचे नुकसानच झाले होते. मात्र, गतवर्षीचे नुकसान यंदाच्या उत्पादनातून भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी हातउसणे पैसे घेऊन चाढ्यावर मूठ धरली मात्र, प्रतिकूल वातावरणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या खरिपातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या सर्वच पिकांवर रोगराई पसरली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी केलेली मेहनत, ऊत्पन्नावर खर्च याचा ताळमेळ नसल्याने आता जगावे तरी कसे हा प्रश्नय…
बुलढाणा जिल्ह्यात हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाचे प्रमाण हे कमी राहिलेले आहे. केवळ एका पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्यामुळे उगवणीपासूनच पिकाला ही उतरती कळा लागली होती. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पिकांची वाढ ही खुंटलेलीच असल्याने काढणी खर्चही निघतो का नाही याबाबत शंका आहे. पावसाचे प्रमाण हे कमी असल्याने येथील नदी-नालेही कोरडेठाक आहेत.
मध्यंतरी पावसामुळे मराठवाड्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील पिकांमध्ये अद्यापही पाणी साचून असल्याने उत्पादनात घट तर होणारच आहे शिवाय काढणीही शक्य होत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. तर बुलढाणा जिल्हात पावसाचे प्रमाण हे अत्यल्प आहे. अद्यापही येथील नदी, नाल्यामध्ये पाणी नाही. शिवाय पिकांना पुरेसा पाऊसही जिल्ह्यात झालेला नाही. उलट ढगाळ वातावरणामुळे पिकांवरील किड वाढतच आहे.
दुष्काळात तेरावा अशीच काहीशी स्थिती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे. गतवर्षीही खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. त्याअनुशंगाने पंचनामेही झाले अद्यापपर्यंत नुकसानभरपाईची मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
पावसाची उघडीप ; परतीचा मान्सूनही लांबणार असल्याने खरिप काढणीसाठी शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याचा वांदाच ; रब्बीतील कांदा जोपासण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे अव्हान, कृषी तज्ञांचा मोलाचा सल्ला